शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवरच ठरणार आमदारांच्या तिकिटाचे भवितव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:42 AM

लोकसभा निवडणुकीत तुमच्या विधानसभा मतदारसंघात मागील वेळेपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून दिले, तरच तुमचे तिकीट पक्के, असा दम भाजप-शिवसेना या पक्षांच्या नेतृत्वाने आपल्या आमदारांना भरला असल्याने बहुतांश आमदार आता प्रचारात सक्रिय झाले आहेत.

- अजित मांडके 

ठाणे : लोकसभा निवडणुकीत तुमच्या विधानसभा मतदारसंघात मागील वेळेपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून दिले, तरच तुमचे तिकीट पक्के, असा दम भाजप-शिवसेना या पक्षांच्या नेतृत्वाने आपल्या आमदारांना भरला असल्याने बहुतांश आमदार आता प्रचारात सक्रिय झाले आहेत. युतीमधील मतभेद मिटवून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना प्रचारात उतरवण्याकरिता हा जमालगोटा पक्षनेतृत्वाने स्वपक्षीय आमदारांना दिल्याचे समजते.

अनेक मतदारसंघांत खासदार व आमदार यांच्यातही वादविवाद असतात. तेच खालपर्यंत झिरपल्याने गटातटांचे राजकारण सुरू होते. एखाद्या मतदारसंघात खासदार शिवसेनेचा व आमदार भाजपचा असेल, तर तेथेही वाद व वर्चस्वाची लढाई सुरू असते. या मतभेदांचाच फटका बसण्याची चिन्हे दिसल्याने आता पक्षनेतृत्वाने आमदारांचे लोकसभा निवडणुकीतील प्रगतीपुस्तक पाहून उमेदवारी द्यायची किंवा कसे, हे ठरवण्याचे निश्चित केले आहे.ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सहा विधानसभा मतदारसंघांतून किती मताधिक्य मिळते, त्यावर विधानसभेची गणिते ठरवली जाणार आहेत. बहुतांश विधानसभा मतदारसंघांत नगरसेवक किंवा जिल्हाप्रमुख किंवा जिल्हाध्यक्ष हेही विधानसभा लढवण्याकरिता इच्छुक असतात. त्यामुळे आपली विधानसभा मतदारसंघावरील पकड टिकवायची, तर लोकसभेला गतवेळीपेक्षा अधिक मते उमेदवाराला मिळाली पाहिजेत, याकरिता आमदार कामाला लागले आहेत. तसेच माजी आमदारसुद्धा जोमाने कामाला लागल्याचे चित्र प्रत्येक मतदारसंघात दिसून येत आहे.ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. ही निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी मानली जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला किती मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या स्वपक्षाच्या उमेदवाराला किती मते मिळाली.

महापालिका निवडणुकीत त्या विधानसभा मतदारसंघातील प्रभागात पक्षाची काय कामगिरी होती व आता लोकसभा निवडणुकीत काय चित्र राहते, याचा सारासार विचार करून उमेदवार दिले जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही लोकसभेची कामगिरी हा निकष लावला जाणार असल्याचे समजते. भाजपमध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा यांची एक कार्यपद्धती आहे. परराज्यांतील त्यांचे खास विश्वासू निरीक्षक प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रचाराबाबत माहिती घेऊन शहा यांना अहवाल देतात. त्या मतदारसंघातील काही प्रतिष्ठित मंडळींकडूनही शहा माहिती घेतात. त्यामुळे भाजपमध्ये आमदारांच्या कामगिरीचे बारकाईने अवलोकन केले जाते. समजा, शिवसेनेचा आमदार असेल, तर तेथे मित्रपक्षाने किती मदत केली, याचाही हिशेब ठेवला जातो. विधानसभा निवडणूक युती करून लढवायची ठरले, तर भाजप शिवसेनेच्या नेतृत्वालाही आपल्याकडील माहिती देऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आमदारांनी किती सहकार्य केले, यावर थेट शरद पवार यांचे बारीक लक्ष असते. सध्या ठाणे विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार संजय केळकर हे जवळजवळ प्रत्येक प्रचार रॅली आणि सभांना हजर राहताना दिसत आहेत. केळकर हे आपली विधानसभेची गणिते आतापासूनच बांधत आहेत. दुसरीकडे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांना प्रत्येक प्रचारफेरीत सहभागी राहण्यास सांगितले आहे.

>आधी सेनेशी संघर्ष, आता सेनेसाठीच सर्वस्व

ओवळा-माजिवडा मतदारसंघात आमदार सरनाईक हे विचारे यांना आघाडी देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परंतु, मीरा-भार्इंदरमधून सेनेच्या उमेदवाराला अधिकची मते कशी मिळतील, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असून यावरच त्यांचे विधानसभेचे गणित पक्के होणार आहे. मागील निवडणुकीत मीरा-भार्इंदरने सेनेला पिछाडीवर टाकले होते, तर ठाण्याने आघाडी दिली होती. मीरा-भार्इंदर मतदारसंघात भाजपचे आमदार मेहता यांचा आतापर्यंत सेनेशी संघर्ष झाला असला, तरी आता त्यांच्यावरही सेनेच्या उमेदवाराकरिता सर्व शक्ती पणाला लावणे बंधनकारक आहे. पक्षाने दिलेल्या तंबीचा धसका जवळपास सर्वच आमदारांनी घेतला होता. त्यामुळे आतापर्यंत प्रचारातून अंग काढू पाहणारे आमदार आता प्रचारकामाला भिडले आहेत. पुन्हा आमदारकी मिळवायची असेल, तर लोकसभा गाजवण्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांना समजून चुकलं आहे.नवी मुंबईत पुन्हा एककलमी सत्ता संपादित करण्यासाठी आणि हातून निसटलेल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघावर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी गणेश नाईक फॅमिलीने डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघांतून पुन्हा मतांचे निर्विवाद वर्चस्व राष्टÑवादीचे लोकसभेचे उमेदवार आनंद परांजपे यांना देण्यासाठी नाईक कुटुंबीय जोमाने मैदानात उतरले आहे. बेलापूरमध्ये भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे असून त्यासुद्धा शिवसेनेसाठी मतांचा जोगवा मागत आहेत.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे