शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 05:33 IST

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी आयएनएस हमला या सैन्यदलाच्या मुंबईतील तळावर विमानाने आणण्यात आले

मीरा रोड : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी आयएनएस हमला या सैन्यदलाच्या मुंबईतील तळावर विमानाने आणण्यात आले असून, उद्या सकाळी त्यांच्या मीरा रोड येथील घरी आणले जाणार आहे. सकाळी ९ पासून नागरिकांना अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर, मीरा रोडच्या वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौस्तुभ यांच्या वडिलांचे दूरध्वनीवरून सांत्वन केले.काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झालेले २९ वर्षीय मेजर कौस्तुभ यांचे पार्थिव सकाळी काश्मीरहून दिल्लीला आणण्यात आले. दुपारी ३ वाजता दिल्लीहून त्यांचे पार्थिव मालाडच्या आयएनएस हमला या लष्करीतळावर आणण्यात आले.बुधवारी त्यांचे पार्थिव येण्याची शक्यता पाहता, महापालिकेने परिसरात तसेच मीरा रोड वैकुंठभूमीत साफसफाई करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून ठेवल्या होत्या. दरम्यान, सायंकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक यांनी राणे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी दूरध्वनीवरून मेजर राणे यांचे वडील प्रकाश यांचे सांत्वन केले. मेजर राणे व तुम्हा कुटुंबीयांचा सार्थ अभिमान असून, मीरा-भार्इंदरमध्ये त्यांचे स्मारक उभारणार असल्याचे सांगितले. शिंदे यांनी एकूणच व्यवस्थेचा आढावा घेतला, तसेच मराठा समाजास शहरातील बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. सकाळी पालकमंत्री विनोद तावडे यांनी राणे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सकाळपासूनच नागरिकांनी राणे यांच्या निवासस्थानाजवळ गर्दी करण्यास सुरुवात केली होती. या वीरपुत्राला आदरांजली वाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. सोशल मीडियावरूनही शहीद राणे यांना आदरांजली वाहिली जात आहे.मालाडच्या आयएनएस हमला या लष्करीतळावरून सकाळी ५ वाजता सैन्यदलाचे अधिकारी व जवान शहीद मेजर राणे यांचे पार्थिव घेऊन मीरा रोडला घरी येण्यास निघतील. सकाळी ६ च्या दरम्यान पार्थिव त्यांच्या शीतलनगरमधील हिरलसागर इमारतीमधील निवासस्थानी आणले जाईल. सकाळी ९ च्या सुमारास त्यांचे पार्थिव घरातून बाहेर आणले जाईल व नागरिकांसाठी अंत्यदर्शनास ठेवले जाणार आहे. सकाळी ११ च्या सुमारास अंत्ययात्रा निघणार असून, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.>पालकमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी शहीद मेजर राणे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी शहीद मेजर राणे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.