शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

उल्हासनगरला हवा वाढीव एफएसआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:23 AM

शहर विकास आराखड्यासंदर्भात उलटसुलट येणा-या प्रतिक्रिया, संभ्रम, राजकीय आरोपामुळे नेमके चित्र स्पष्ट होण्यासाठी गुरूवारी झालेल्या विशेष बैठकीत वाढीव एफएसआयची मागणी करण्यात आली.

उल्हासनगर : शहर विकास आराखड्यासंदर्भात उलटसुलट येणा-या प्रतिक्रिया, संभ्रम, राजकीय आरोपामुळे नेमके चित्र स्पष्ट होण्यासाठी गुरूवारी झालेल्या विशेष बैठकीत वाढीव एफएसआयची मागणी करण्यात आली. भविष्यात उल्हासनगर जर उंच वाढमार असेल, तर क्लस्टरला मंजुरी, टीडीआरबद्दल धोरण ठरवावे लागेल, असे आराखडा तयार केलेल्या सेफ्ट कंपनीने स्पष्ट केले. त्याला आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनीही सहमती दर्शवली.स्थानिक केबल वाहिनीवरून या बैठकीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. पण ज्यांच्यासाठी ही बैठक झाली, ज्यांनी याचे राजकारण करत त्याला विरोध करण्यास सुरूवात केली, त्यातील ७० टक्के नगरसेवकांनी या बैठकीला दांडी मारली. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आरखड्यावर आक्षेप घेत रिंग रोडमुळे झोपडपट्टीवर नांगर फिरणार असल्याची प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षनेते धनजंय बोडारे, शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरसेवक अरूण अशांत, सुनील सुर्वे, पीआरपीचे गटनेते प्रमोद टाले, भारिपच्या गटनेत्या सविता तोरणे, शिवाजी रगडे आदींनी विकास आराखडयातील उणीवांवर बोट ठेवले.विकास आराखडा बनवणारी अहमदाबाद येथील सेफ्ट कंपनीच्या अधिकाºयांनी स्वरूप, विकासक्षेत्र, हरित पट्टे आरक्षण, रहिवासी क्षेत्र, औघोगिक व व्यापारी क्षेत्र यांची माहिती दिली. शहराची उभी वाढ करणे शक्य असल्याने चार चटईक्षेत्राची गरज आहे. तसेच शहराचे क्षेत्रफळ जेमतेम १३ किलोमीटर असून ७ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या आहे. गेल्या १० वर्षापासून लोकसंख्या वाढण्याची क्षमता घटली असून सध्या तो दर सात टक्के आहे, असे त्यांनी लक्षात आणून दिले.हा तर बुलडोझर प्लॅन२०१३ मध्ये सरकारकडे पाठवलेल्या विकास आराखडयावर तब्बल १६ हजार हरकती नागरिकांनी घेतल्या होत्या. त्यापैकी फक्त सहा हजार सूचना ऐकल्या. आराखडा बिल्डरधार्जीणा असल्याची टीका शिवसेनेचे नगरसेवक सुनील सुर्वे, अरूण अशांत यांनी केली. हा बुलडोझर प्लॅन असल्याची टीका बैठकीत त्यांनी केली.आराखड्डयाचे दोन भागसरकारने विकास आराखडयाचे दोन भाग केले असून एका भागाला सरकारची अंतिम मंजुरी आहे. त्यात फेरबदल करायचे असल्यास महासभेत प्रस्ताव आणून मंजूर केलेला प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे पाठवावा लागणार आहे. तर दुसºया भागातील आराखड्यातील विविध आरक्षण, रस्ते, हरितपट्टे आदी बाबत आक्षेप असेल तर त्याची तक्रार कोकण विभागीय आयुक्तांकडील सहसंचालक नगररचनाकार विभागाकडे करावी लागणार आहे. नगरसेवकांच्या हाती फारसे काही राहिले नसून मोठ्या भूखंडावरील आरक्षण आदी हटवण्यात किंवा लावण्यात बिल्डरांना यश आल्याची टीका त्यांच्याकडून सुरू आहे.उल्हासनगरची झेप सिंगापूरकडेकाही अपवाद वगळल्यास आराखडा शहरहिताचा असल्याची प्रतिक्रिया महापौर मीना आयलानी, सभागृह नेते जमनु पुरस्वानी, मनोज लासी, माजी आमदार कुमार आयलानी, प्रदीप रामचंदानी, प्रकाश माखिजा आदींनी दिली. आराखडयामुळे शहराचा विकास सिंगापूरच्या दिशेने होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर