कल्याणमध्ये ‘महावितरण’च्या कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:38 IST2017-08-01T02:38:37+5:302017-08-01T02:38:37+5:30

बॅग बनवण्याच्या कारखान्यातील कामगार नितीश शाहू याच्या अंगावर विजेची तार पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना श्रीराम टॉकीजजवळील रस्त्यावर २७ जुलैला घडली होती.

In front of the office of Mahavitaran in Kalyan | कल्याणमध्ये ‘महावितरण’च्या कार्यालयावर मोर्चा

कल्याणमध्ये ‘महावितरण’च्या कार्यालयावर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : बॅग बनवण्याच्या कारखान्यातील कामगार नितीश शाहू याच्या अंगावर विजेची तार पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना श्रीराम टॉकीजजवळील रस्त्यावर २७ जुलैला घडली होती. शाहूच्या वारसांना भरपाई मिळावी व विजेच्या जीवघेण्या तारांची दुरुस्ती-देखभाल करावी, अन्यथा त्या इतत्र हटवाव्यात, या मागण्यांसाठी काँग्रेसच्या पुढाकारने बॅग मॅन्युफॅक्चरिंग वेल्फेअर असोसिएशनतर्फे शहरातील ‘महावितरण’च्या तेजश्री कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या वेळी कंपनीच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला.
काँग्रेसचे ब्रीजकुमार दत्त, कांचन कुलकर्णी, शैलेश तिवारी, राहुल काटकर, सीमा खान आदी पदाधिकाºयांच्या पुढाकाराने निघालेल्या या मोर्चात बॅग मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शाहू याच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब निराधार झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला. शाहूच्या कुटुंबीयांना भरपाई मिळावी, अशी मागणी मोर्चेकºयांनी या वेळी केली. नितीशच्या मृत्यूस महावितरणचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली.
याप्रकरणी महावितरणचे कार्यकारी अभियंता नंदकिशोर काळे यांची मोर्चेकºयांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी काळे यांनी याप्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. तसेच भरपाई देण्याचाही विचार केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

Web Title: In front of the office of Mahavitaran in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.