मुंबईतील २ अपहृतांची वसईतून मुक्तता

By Admin | Updated: May 8, 2017 04:29 IST2017-05-08T04:29:40+5:302017-05-08T04:29:40+5:30

वसई येथील कार्यालयात अपहरण करून डांबून ठेवलेल्या दोन तरुणांची मुंबई पोलिसांनी सुखरूप सुटका केली. याबाबतची तक्र ार मुलुंड

Free of Vasai from Mumbai 2 abducted | मुंबईतील २ अपहृतांची वसईतून मुक्तता

मुंबईतील २ अपहृतांची वसईतून मुक्तता

लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : वसई येथील कार्यालयात अपहरण करून डांबून ठेवलेल्या दोन तरुणांची मुंबई पोलिसांनी सुखरूप सुटका केली. याबाबतची तक्र ार मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल होताच, दोन तासांतच या प्रकरणाचा छडा लाऊन पाच आरोपींना अटक केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ तारखेला रात्री अडीच वाजता मुलुंड पोलीस ठाण्यात नितीन माच्छर यांनी आपला लहान भाऊ सुनील माच्छर व त्याचा मित्र भरतकुमार सिराई यांचे अपहरण करण्यात आले असून, त्यांना वसई येथील त्यांच्या कार्यालयात दोन लाखांच्या खंडणीसाठी मारहाण होत असल्याची असल्याची तक्र ार पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी दोन तपास पथके वसईला तत्काळ रवाना केली. अपहरण करण्यात आलेले तरुण मनीष ठाकूर यांच्या कार्यालयात असल्याची माहिती हाती येताच, या ठिकाणी छापा मारून या दोन तरुणांची सुटका केली व या कार्यालयातून मनीष ठाकूर, जनप्रकाश पुरोहित, सिद्दिक राहीन, प्रसन्नाकुमार राय, हितेन पटेल यांना ताब्यात घेतले.
अपहृत तरुणांची पोलिसांनी चौकशी केली असता, जनक प्रकाश राजपुरोहित यांनी त्यांच्याकडील ६३ लाख व हितेन पटेल यांचे ५० लाख अशा एकूण १ कोटी १३ लाख रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा बदली करण्याकरिता त्यांना दिल्या होत्या. त्यांनी त्या नोटा बदली करण्याकरिता दुसऱ्या इसमाकडे दिल्या असता, तो नोटा घेऊन फरार झाला. दिलेले पैसे परत न केल्याने त्यांनी या तरुणांचे अपहरण करून ठाकूर यांच्या कार्यालयात डांबून ठेवले होते व त्यांना मारहाण केली जात होती़

Web Title: Free of Vasai from Mumbai 2 abducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.