ठाण्यात लवकरच मुत्रपिंड विकारांवर मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:47 AM2021-09-10T04:47:59+5:302021-09-10T04:47:59+5:30

महापौर नरेश म्हस्के यांची गणपती निमित्त ठाणेकरांना भेट लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मुत्रपिंडाचे आजार, शस्त्रक्रिया व उपचार घेण्यासाठी ...

Free treatment for kidney disorders in Thane soon | ठाण्यात लवकरच मुत्रपिंड विकारांवर मोफत उपचार

ठाण्यात लवकरच मुत्रपिंड विकारांवर मोफत उपचार

Next

महापौर नरेश म्हस्के यांची गणपती निमित्त ठाणेकरांना भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : मुत्रपिंडाचे आजार, शस्त्रक्रिया व उपचार घेण्यासाठी रुग्णांना आता लांब जाण्याची गरज नाही. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटरमध्ये मुत्रपिंडाचे आजार व त्यासंबंधी शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात येणार आहे, तसेच या अंतर्गत संबंधित आजारांवरील सर्व उपचार मोफत होणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सेंटर सुरू करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने बुधवारी (८ सप्टेंबर) झालेल्या महासभेत याबाबतचा ठराव सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजूर केला आहे. या सेंटरच्या माध्यमातून अनेक गरीब व गरजू रुग्णांना नि:शुल्क कार्डिओलाजिस्ट आणि कार्डियाक सर्जन कन्स्ल्टेशन, ईसीजी, २ डी इको, टीएमटी, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास व व्हॉल्व्ह सर्जरी, थ्रोमोबिलीशन उपचार, ट्रोप टी व ट्रोपोनिन टेस्ट, एबीसी चाचणी आदी वैद्यकीय सेवा पुरविल्या जात आहेत.

Web Title: Free treatment for kidney disorders in Thane soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.