शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

मधुमेहींसाठी मोफत नेत्र शिबीर, ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये होणार नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:54 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये होणार नोंद

ठाणे : येथील आयबेटिक्स फाउंडेशन आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी मोफत नेत्र आणि किडनी तपासणी शिबिर ठाणे टाऊन हॉल येथे होणार आहे. जिल्हाभरातून १५०० हून अधिक रु ग्ण श्बििरात विनामूल्य लाभ घेणार आहेत. हा एक विक्रम असून त्याची ‘गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद होणार आहे. मधुमेहींमध्ये नेत्र व किडनीचे आरोग्य याबाबत जनजागृती करण्याचा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे नार्वेकर आणि फाउंडेशनचे डॉ. निशांत कुमार यांनी सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व महापालिका, नगर परिषद, हाउसिंग सोसायटी इत्यादी घटक या शिबिराच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. शिबिराला राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. शिबिरात सर्वप्रथम ठाणे मेन्टल हॉस्पिटल येथून येणाºया मधुमेही मनोरु ग्णांची तपासणी केली जाईल. शिबिरामध्ये रुग्ण घेऊन येणाºया आशा सेविका व गटप्रवर्तक यांना प्रति रुग्ण १०० रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. संपूर्ण आरोग्य शिबिराचे नियोजन निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील व जिल्हा समन्वयक डॉ. तरु लता धानके करत आहेत. तर, जिल्हाधिकाऱ्यांनी या सामाजिक कृतज्ञतेतून होत असलेल्या उपक्र माची गिनीज बुकात नोंद होऊन त्याद्वारे मधुमेहामुळे येणारे अंधत्व व मूत्रपिंड निकामी होणे याबाबत जनजागृती होईल. यासाठी दी ठाणे डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशन लि. या संस्थेनेही पुढाकार घेतला आहे.मृत्यू टाळता येतीलठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागातील रु ग्णांमध्ये मधुमेहामुळे येणारे अंधत्व व किडनीचे आजार याविषयी जनजागृती व्हावी यासाठी हा उपक्रम होत आहे. अंधत्व व किडनी निकामी होणे या तक्र ारींसाठी मधुमेह हे सर्वाधिक मोठे कारण आहे. त्यासाठी नियमित नेत्र व किडनी तपासणी केल्यामुळे अनेक जणांना अंधत्व व किडनी निकामी होऊन मृत्यूच्या घटना टाळता येऊ शकतील.

टॅग्स :thaneठाणे