गणेशोत्सवासाठी कोकणात शिवसेनेतर्फे मोफत बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:42 IST2021-08-22T04:42:29+5:302021-08-22T04:42:29+5:30

कल्याण : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेचे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत बससेवा उपलब्ध करून दिली जाणार ...

Free bus service from Shiv Sena in Konkan for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी कोकणात शिवसेनेतर्फे मोफत बससेवा

गणेशोत्सवासाठी कोकणात शिवसेनेतर्फे मोफत बससेवा

कल्याण : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेचे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने चाकरमानी मेटाकुटीला आला आहे. तसेच कोकणावर अतिवृष्टीने मोठे संकट ओढावले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी त्यांच्या आप्तस्वकीयांसोबत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणवासीय उत्सुक आहेत. महाड, मंडणगड, दापोली, खेड, चिपळूणमार्गे गुहागर, रत्नागिरी, मालवण, देवगड, वेंगुर्ला, कणकवली, सावंतवाडी येथे गणेशोत्सवासाठी जाण्याकरिता डोंबिवलीतून मोफत बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. डोंबिवली शिवसेना शहर शाखेतील सतीश मोडक, संतोष चव्हाण, सागर जेधे यांच्याशी संपर्क साधावा. बसमध्ये सीट आरक्षित करण्यासाठी ४ सप्टेंबर ही शेवटची तारीख असेल, अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिली आहे.

-----------------

Web Title: Free bus service from Shiv Sena in Konkan for Ganeshotsav