बनावट धनादेशाद्वारे एक लाख १९ हजारांची फसवणूक: एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 11:35 PM2020-09-13T23:35:23+5:302020-09-13T23:39:39+5:30

मंदिरासाठी ७६ पंख्यांची आॅर्डर देऊन त्याबदल्यात बनावट धनादेश देऊन एक लाख १९ हजारांची फसवणूक करणाऱ्या भरत निमावंत (४६, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याला १४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Fraud of Rs 1 lakh 19,000 through fake checks: One arrested | बनावट धनादेशाद्वारे एक लाख १९ हजारांची फसवणूक: एकास अटक

कापूरबावडी पोलिसांची कामगिरी

Next
ठळक मुद्दे कापूरबावडी पोलिसांची कामगिरी जैन मंदिरासाठी पंख्यांची आॅर्डर असल्याची केली बतावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एका जैन मंदिरासाठी पंखे लागणार असल्याची बतावणी करीत ७६ पंख्यांची आॅर्डर देऊन त्याबदल्यात बनावट धनादेश देऊन एक लाख १९ हजारांची फसवणूक करणा-या भरत निमावंत (४६, रा. शिवाईनगर, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख १९ हजारांचे ७६ पंखेही जप्त करण्यात आले आहेत.
भरत निमावंत आणि त्याच्या साथीदाराने मुंबईतील जोगेश्वरी येथील व्यापारी श्यामभुवन विश्वकर्मा (३६) यांना जैना मंदिरासाठी सिलिंग फॅन लागणार असल्याची बतावणी केली. त्यासाठी त्यांना ७६ सिलिंग फॅनची आॅर्डरही दिली. या आॅर्डरची डिलीव्हरी त्याने ठाण्यातील कापूरबावडी नाका येथे असलेल्या बिग बाजार याठिकाणी २५ जुलै रोजी दुपारी ३ आणि २६ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घेतली. त्याबदल्यात त्यांनी विश्वकर्मा यांना रोख पैसे देण्याऐवजी चलनात नसलेले दुसºयाच्या नावाने असलेले एक लाख १९ हजारांचे धनादेश दिले. वारंवार पाठपुरवा करुनही त्यांनी याचे त्यांना पैसे न देता त्या रकमेचा अपहार करुन विश्वकर्मा यांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्वकर्मा यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबर रोजी फसवणूकीची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या पथकाने खबऱ्यांच्या मदतीने भरत याला शिवाईनगर येथून ९ सप्टेंबर रोजी रात्री अटक केली. त्याला १४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Fraud of Rs 1 lakh 19,000 through fake checks: One arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.