शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

करोडोंची फसवणूक : मैत्रेयच्या संचालकांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 10:25 PM

ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि भिवंडी परिसरांतील शेकडो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांना गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेयच्या संचालकांना पकडण्यासाठी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन पथकांची निर्मिती केली आहे.

ठाणे : ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि भिवंडी परिसरांतील शेकडो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांना गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेयच्या संचालकांना पकडण्यासाठी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन पथकांची निर्मिती केली आहे. या पथकांकडून गुंतवणूकदारांचे जबाब घेण्याबरोबरच आरोपींचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चरर्स प्रा.लि. आणि मैत्री रियलटर्स अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या कंपनीच्या संचालकांनी ठिकठिकाणी एजंट नेमून त्यांच्यामार्फत कंपनीत आकर्षक योजना असल्याची बतावणी केली. त्याद्वारे काही ठिकाणी सहा वर्षांत पैसे दुप्पट देण्याच्या तर काही ठिकाणी जमिनीमध्ये पैसे गुंतवूणक करणाºयांना चांगला मोबदला देण्याचे प्रलोभन दाखवले. याच एजंटांच्या मदतीने वर्षा सत्पाळकर (रा. विरार, पालघर), जनार्दन परुळेकर (रा. विरार, पालघर), अजित पठारे (रा. नालासोपारा, ठाणे), ज्ञानेश्वर वैद्य, लक्ष्मीकांत नार्वेकर आणि विजय तावरे तसेच इतरांनी सुमारे ५५० ते ६०० जणांची फसवणूक करून त्यांच्याकडून १० ते १५ कोटी रुपये उकळले आहेत. विशेष म्हणजे मैत्री सुवर्णसिद्धी कंपनीला अशा प्रकारच्या ठेवी स्वीकारण्याला ‘सेबी’ (सिक्युरिटी अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) यांच्याकडून निर्बंध घालण्यात आले होते. तरीही, मैत्रेय उद्योगसमूहाने गुंतवणूकदारांना अशक्यप्राय अशा तसेच आकर्षित योजनांचे आमिष दाखवून कळवा, भिवंडी, कल्याण, घोडबंदर रोड, मुंबई, नवी मुंबईतील अनेक गुंतवणूकदारांकडून करोडो रुपयांच्या रकमा स्वीकारल्या. हे पैसे परत न करताच त्यांचा अपहार केला. आता याप्रकरणी आमदार संजय केळकर यांच्या मागणीनंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू करण्यात आला असून दोन अधिकाºयांची पथके तयार केल्याची माहिती उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली.१९ वर्षात १५०० कोटींची फसवणूकमैत्रेय ग्रुप कंपनी निरनिराळया नावाने १९९८ पासून सात ते आठ राज्यात कार्यरत होती. संचालक व मालक मधुसूदन सत्पाळकर याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी वर्षा सत्पाळकर ही हा ‘उद्योग’ सांभाळत होती. नाशिक येथे संबंधितांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे बोलले जाते. गेल्या १९ वर्षाच्या कार्यकाळात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त होत असून ती रक्कम १५०० कोटीपर्यंत जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. कळवा येथील २९ वर्ष बंद असलेल्या मफतलाल कंपनीच्या कामगारांच्या महिलांनी या कंपनीमध्ये पैसे गुंतविले असून फसवणूक झाल्यामुळे त्यांना आणखीनच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.