शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

टिटवाळ्यात देवीच्या विसर्जनाला गेलेले चार जण बुडाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 14:12 IST

टिटवाळा येथील ओमकारेश्वर सदन तरूण मित्र मंडळाच्यावतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो.

उमेश जाधव

टिटवाळा - कल्याण तालुका टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडा टिटवाळा जवळील असणाऱ्या वासुंद्री गावालगतच्या काळू नदीपात्रात बुधवारी रात्री 12 सुमारास देवी विसर्जनासाठी गेलेल्या चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. तरुणांचे मृतदेह शोधण्याचे काम अग्निशमन दल व स्थानिक पोहणारे यांच्या मदतीने सुरू आहे. या घटनेमुळे मांडा टिटवाळा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, मांडा टिटवाळा येथील ओमकारेश्वर सदन तरूण मित्र मंडळाच्यावतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. बुधवारी रात्री देवीच्या विसर्जन मिरवणूक काढून देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी येथील वासुंद्री गावाजवळील काळू नदीवर नेण्यात आले. रात्री बाराच्या सुमारास मंडळाचे आठ तरुण देवीची मूर्ती घेऊन काळू नदीच्या पात्रात उतरले. यावेळी देवीची मूर्ती कलवंडली यामुळे हे तरुण खोल पाण्यात पडले. यापैकी पोहणारे सहा तरूण बाहेर आले. याच वेळी दोन तरुण बुडत असताना त्यांना वाचविण्यासाठी इतर दोन पोहणाऱ्या तरूणांनी पाण्यात उड्या मारल्या. परंतु पाण्याचा प्रवाह व खोली जास्त असल्याने यात विश्वास तुकाराम पवार (35), रुपेश तुकाराम पवार (22), सिद्धेश आनंत पार्टे (22) व सुमित मारूती वायदंडे (26) या चार तरुणांना काळू नदीच्या वाहत्या पाण्याचा अंदाज आला नाही. बघता बघता ते पाण्याच्या प्रवाहात खोलवर वाहत गेले आणि बुडाले. रात्री अंधार असल्यामुळे ते दिसेनासे झाले.

बुधवारीच रात्रीच टिटवाळा पोलीस व कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन  दलाच्या जवानांनी पहाटे चार वाजेपर्यंत सदर तरूणांचा शोध घेतला परंतू ते सापडले नाहीत. गुरूवारी सकाळी दहा वाजल्यापासून पुन्हा टिटवाळा पोलीस व कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवान व स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. या घटनेमुळे मांडा-टिटवाळा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत एकाच घरातले दोघे भाऊ बुडाल्याने पवार कुटुंबावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. 

बुधवारी रात्री अंधार व पाण्याचा प्रवाह यामुळे तसेच गुरूवारी दुपारी भरतीची वेळ असल्यामुळे पाणी वाढत आहे. या कारणास्तव शोध कार्यात अडचणी येत आहे. अग्निशमन दल व स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने शोध कार्य सुरू आहे. 

- कमलाकर मुंडे, पीएसआय, टिटवाळा. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेthaneठाणेDeathमृत्यूPoliceपोलिस