भिवंडीत महिलेनं दिला चार बाळांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 02:22 IST2018-08-11T02:22:13+5:302018-08-11T02:22:23+5:30

शहरातील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा सरकारी रुग्णालयात शुक्रवारी महिलेने चार बाळांना जन्म दिला.

Four babies born in the future women gave birth | भिवंडीत महिलेनं दिला चार बाळांना जन्म

भिवंडीत महिलेनं दिला चार बाळांना जन्म

भिवंडी : शहरातील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा सरकारी रुग्णालयात शुक्रवारी महिलेने चार बाळांना जन्म दिला. चारही बाळांची प्रकृती आणि बाळंतीण सुखरूप असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
गुलशन हकीक अन्सारी (२६) ही पिराणीपाडा, शांतीनगर या भागात राहते. ती गरोदर असताना गर्भात चार बाळं असल्याचे वैद्यकीय तपासणीतून समजले होते. त्यामुळे तिने प्रसूतीसाठी आपले नाव सायन रुग्णालयात नोंदविले होते. परंतु, दुपारी १२ वाजता त्रास होऊ लागल्याने सासरे शकील अहमद अन्सारी आणि कुटुंबीयांनी तिला इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी शेगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री डोंगरे यांनी प्रसूतीचा निर्णय घेतला. गुलशन हिने प्रथम मुलीस आणि नंतर तीन मुलांना जन्म दिला.
>महिलेची प्रसूती नैसर्गिक झाली असून बाळांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याची माहिती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांनी दिली. या बाळांना पाहण्यासाठी रूग्णालयात नागरिकांनी गर्दी केली.

Web Title: Four babies born in the future women gave birth

टॅग्स :thaneठाणे