शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

ठाण्यातून १७ लाख ९६ हजारांच्या रोकडसह एटीम संचाची चोरी करणारे चौघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 01:53 IST

ठाण्यातील दहिसर गावामधील एका एटीएम केंद्राच्या संचासह १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडची चोरी करणाऱ्या अतुल दवणे याच्यासह चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. तर त्यांच्या पाचव्या साथीदारालाही उत्तरप्रदेशातून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरीचौघांना ४८ तांसामध्ये अटकपाचव्याला उत्तरप्रदेशातून अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दहिसर गावातील एक्सीस बँकेच्या अ‍ॅटोमेटेड टेलर मशिन (एटीएम) संचाची १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडसह चोरी करणाºया अतुल दवणे (२२, रा. तुर्भे, रायगड), सूरज म्हात्रे (२९, रा. खरड, अंबरनाथ, ठाणे), दादासो उर्फ सूरज कांबळे (२४, रा. बेलापूर, नवी मुंबई) आणि फुलाजी गायकर (३६, रा. कुशुरी, अंबरनाथ) चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी सकाळी अटक केली. त्यांना १९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाणे तालुक्यातील दहिसर ग्रामपंचायतीजवळ असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम केंद्रातील एक जाड पत्र्याचे एनसीआर कंपनीचे एटीएम संच हे १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडसह चोरीस गेल्याची तक्रार शीळडायघर पोलीस ठाण्यात ८ जून रोजी दाखल झाली होती. याप्रकरणाचा डायघर पोलिसांप्रमाणे युनिट एकचे पथकही तपास करीत होते. या चोरीतील सूरज म्हात्रे आणि फूलाजी गायकर हे दोघे कल्याणच्या हाजी मलंग रोडव येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे म्हात्रे आणि गायकर या दोघांना हाजी मलंग रोड भागातून तर उर्वरित दोघांना तुर्भे येथून ११ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. यातील अतूल हा मिस्त्री,सूरज रिक्षा चालक ,सूरज कांबळे हा सुरक्षा रक्षक असून चौथा साथीदार फुलाजीचे झेरॉक्सचे दुकान आहे. या चोरीतील सूत्रधार भीम नेपाळी आणि प्रदीप हे दोघे असून ते दवणे, म्हात्रे, कांबळे आणि गायकर या चौघांच्या संपर्कात होते. त्यांचे अन्य दोन साथीदार उल्हासनगर आणि बदलापूर येथील असून या सर्वांचा शोध घेण्यात येत आहे.ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला, गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रविण पवार, दीपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, समीर अहिरराव, योगेश काकड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, कैलास सोनवणे, पोलीस हवालदार आनंदा भिलारे, आबुतालिब शेख, सुनिल जाधव, रवींद्र पाटील, प्रकाश कदम, सुभाष मोरे, शिवाजी गायकवाड, संभाजी मोरे, सुनिल माने, नरसिंह महापुरे, रवींद्र काटकर, पोलीस नाईक संजय बाबर, दादासाहेब पाटील, विक्रांत कांबळे, किशोर भामरे, राहूल पवार, संजय दळवी, चंद्रकांत वाळूंज, अजय साबळे आणि भगवान हिवरे आदींच्या पथकाने यशस्वी केली.*सूत्रधारापैकी भीमा बहाद्दूर जोरा हा नेपाळचा असून तो या चोरीनंतर नेपाळमध्ये पळून जात असल्याचीही माहिती ठाणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार उत्तरप्रदेश येथील स्पेशल टास्क फोर्सचे पोलीस उपअधीक्षक पी. के. मिश्रा, निरीक्षक ज्ञानेंद्रकुमार राय यांच्या पथकाने भीमा याला खासगी बसने उत्त्रप्रदेश येथे पळून जात असतांना उत्तरप्रदेशातील कानपूर, लखनौ महामार्गावरील टोलनाक्यावर सापळा लावून बसमधून ताब्यात घेतले. त्यालाही ताब्यात घेण्यासाठी ठाणे युनिट एकचे पथक उत्तरप्रदेश येथे पाठविण्यात आले आहे. उर्वरित तिघांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी