ठाण्यातून १७ लाख ९६ हजारांच्या रोकडसह एटीम संचाची चोरी करणारे चौघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 07:57 PM2020-06-11T19:57:46+5:302020-06-12T01:53:03+5:30

ठाण्यातील दहिसर गावामधील एका एटीएम केंद्राच्या संचासह १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडची चोरी करणाऱ्या अतुल दवणे याच्यासह चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. तर त्यांच्या पाचव्या साथीदारालाही उत्तरप्रदेशातून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Four arrested for stealing ATM sets worth Rs 17.96 lakh from Thane | ठाण्यातून १७ लाख ९६ हजारांच्या रोकडसह एटीम संचाची चोरी करणारे चौघे जेरबंद

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी

Next
ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरीचौघांना ४८ तांसामध्ये अटकपाचव्याला उत्तरप्रदेशातून अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दहिसर गावातील एक्सीस बँकेच्या अ‍ॅटोमेटेड टेलर मशिन (एटीएम) संचाची १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडसह चोरी करणाºया अतुल दवणे (२२, रा. तुर्भे, रायगड), सूरज म्हात्रे (२९, रा. खरड, अंबरनाथ, ठाणे), दादासो उर्फ सूरज कांबळे (२४, रा. बेलापूर, नवी मुंबई) आणि फुलाजी गायकर (३६, रा. कुशुरी, अंबरनाथ) चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी सकाळी अटक केली. त्यांना १९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाणे तालुक्यातील दहिसर ग्रामपंचायतीजवळ असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम केंद्रातील एक जाड पत्र्याचे एनसीआर कंपनीचे एटीएम संच हे १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडसह चोरीस गेल्याची तक्रार शीळडायघर पोलीस ठाण्यात ८ जून रोजी दाखल झाली होती. याप्रकरणाचा डायघर पोलिसांप्रमाणे युनिट एकचे पथकही तपास करीत होते. या चोरीतील सूरज म्हात्रे आणि फूलाजी गायकर हे दोघे कल्याणच्या हाजी मलंग रोडव येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे म्हात्रे आणि गायकर या दोघांना हाजी मलंग रोड भागातून तर उर्वरित दोघांना तुर्भे येथून ११ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. यातील अतूल हा मिस्त्री,सूरज रिक्षा चालक ,सूरज कांबळे हा सुरक्षा रक्षक असून चौथा साथीदार फुलाजीचे झेरॉक्सचे दुकान आहे. या चोरीतील सूत्रधार भीम नेपाळी आणि प्रदीप हे दोघे असून ते दवणे, म्हात्रे, कांबळे आणि गायकर या चौघांच्या संपर्कात होते. त्यांचे अन्य दोन साथीदार उल्हासनगर आणि बदलापूर येथील असून या सर्वांचा शोध घेण्यात येत आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला, गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रविण पवार, दीपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, समीर अहिरराव, योगेश काकड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, कैलास सोनवणे, पोलीस हवालदार आनंदा भिलारे, आबुतालिब शेख, सुनिल जाधव, रवींद्र पाटील, प्रकाश कदम, सुभाष मोरे, शिवाजी गायकवाड, संभाजी मोरे, सुनिल माने, नरसिंह महापुरे, रवींद्र काटकर, पोलीस नाईक संजय बाबर, दादासाहेब पाटील, विक्रांत कांबळे, किशोर भामरे, राहूल पवार, संजय दळवी, चंद्रकांत वाळूंज, अजय साबळे आणि भगवान हिवरे आदींच्या पथकाने यशस्वी केली.
*सूत्रधारापैकी भीमा बहाद्दूर जोरा हा नेपाळचा असून तो या चोरीनंतर नेपाळमध्ये पळून जात असल्याचीही माहिती ठाणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार उत्तरप्रदेश येथील स्पेशल टास्क फोर्सचे पोलीस उपअधीक्षक पी. के. मिश्रा, निरीक्षक ज्ञानेंद्रकुमार राय यांच्या पथकाने भीमा याला खासगी बसने उत्त्रप्रदेश येथे पळून जात असतांना उत्तरप्रदेशातील कानपूर, लखनौ महामार्गावरील टोलनाक्यावर सापळा लावून बसमधून ताब्यात घेतले. त्यालाही ताब्यात घेण्यासाठी ठाणे युनिट एकचे पथक उत्तरप्रदेश येथे पाठविण्यात आले आहे. उर्वरित तिघांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title: Four arrested for stealing ATM sets worth Rs 17.96 lakh from Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.