ठाणे - मध्य प्रदेशातून मेफेड्रॉन एमडीची तस्करी करणाऱ्या इम्रान ऊर्फ बब्बू खान (३७) याच्यासह चौघांना अटक करण्यात आली. या आरोपींकडून एक किलो ७१ ग्रॅम सहा मिलीग्रॅम वजनाच्या एमडीसह दोन कोटी २४ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गुरुवारी दिली.
अमली पदार्थ विक्रीबाबत विशेष मोहीम राबवून कडक कारवाईचे आदेश ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उपायुक्त जाधव, सहायक पोलिस आयुक्त रवींद्र दौंडकर आणि अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल मस्के यांनी विशेष मोहीम राबविली. तपास सुरू असताना हवालदार अमित सकपाळ यांना तस्करांची माहिती मिळाली. त्यानुसार ३ नोव्हेंबर रोजी चरईतील एमटीएनएल कार्यालयासमोर एमडी तस्करीसाठी आलेल्या इम्रान याच्यासह वकास खान (३०), ताकुद्दीन खान (३०) आणि कमलेश चौहान (२३) यांना ताब्यात घेतले.
सराईत आराेपींना १५ नाेव्हेंबरपर्यंत काेठडी तस्करीसाठी वापरलेल्या एका कारसह दोन कोटी २४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला. एमडीचे उत्पादन, विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांमध्ये आणखी कोणा कोणाचा समावेश आहे? याचा तपास करण्यात येत असल्याचे उपायुक्त जाधव यांनी सांगितले. आरोपींना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. आराेपींपैकी इम्रान आणि कमलेश हे दोघे जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
Web Summary : Thane police arrested four, including Imran Khan, for smuggling mephedrone from Madhya Pradesh. They seized MD worth ₹2.24 crore, along with a car. Further investigation is underway to identify other involved individuals.
Web Summary : मध्य प्रदेश से मेफेड्रोन की तस्करी करते हुए इमरान खान समेत चार लोगों को ठाणे पुलिस ने गिरफ्तार किया। उन्होंने ₹2.24 करोड़ का एमडी और एक कार जब्त की। आगे की जांच जारी है।