मीरारोड येथे एमडीसह चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:40 IST2021-05-23T04:40:34+5:302021-05-23T04:40:34+5:30

मीरारोड : मीरारोडच्या नयानगर पोलिसांनी एक लाख ८० हजार रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थासह रोकड मिळून चार लाख ...

Four arrested along with MD at Mira Road | मीरारोड येथे एमडीसह चौघांना अटक

मीरारोड येथे एमडीसह चौघांना अटक

मीरारोड : मीरारोडच्या नयानगर पोलिसांनी एक लाख ८० हजार रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थासह रोकड मिळून चार लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपींना अटक केली आहे.

गीतानगर फेज ४ , कानुंगो इस्टेटजवळ काही व्यक्ती एमडीच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप साळुंखे, उपनिरीक्षक आशुतोष चव्हाण यांसह पवार, पाटील यांच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी एमडी विक्रीसाठी आलेल्या अल्तमश युसूफ शेख (वय ३०, रा. जनता सेवक सोसायटी, माहीम बसडेपो मागे), शोएब नूर मोहम्मद कुरेशी (३१, रा . नयानगर) व अल्ताफ युनूस शेख (३८, रा . गीतानगर फेज ४) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून ६० ग्रॅम एमडी, ५ ग्रॅम चरस व गुन्ह्यातील दोन दुचाकी असा एक लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी तपासात एमडी हे धारावीच्या सचिनम इमारतीत राहणाऱ्या शमशेर ऊर्फ शम्मी मोहम्मद कुन्नी (२८) याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानुसार स्थानिक धारावी पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी शम्मी यास धारावी येथून अटक केली. त्याच्या घरात एक लाख ८० हजार किमतीचे एमडी, एक लाख दोन हजारांची रोकड व दोन मोबाईल मिळून दोन लाख ९२ हजारांचा मुद्देमाल सापडला आहे.

Web Title: Four arrested along with MD at Mira Road