ठाणे महापालिकेचे माजी उपलेखापाल सुधाकर मुळये यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:12 IST2019-08-20T23:07:36+5:302019-08-20T23:12:29+5:30
ठाणे महापालिकेतील माजी उपलेखापाल तथा संघ परिवारातील जेष्ठ कार्यकर्ते सुधाकर मुळये यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

संघ परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्ते
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: संघ परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच ठाणे महापालिकेतील माजी जनसंपर्क अधिकारी सुधाकर मुळये यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, मुलगा मकरंद (जेष्ठ पत्रकार ) आणि नातवंड असा परिवार आहे. येथील जवाहरबाग वैकुंठभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुळये हे १९६० ते १९९४ या कालावधीमध्ये ठाणे नगरपालिका ते महानगरपालिकेच्या सेवेत होते. नगराध्यक्ष आणि महापौर यांचे सचिव म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम केले. मुंब्रा, कोपरी आणि बाळकूम या प्रभागांचे प्रभाग अधिकारी तसेच ठामपाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. उपलेखापाल या पदावरुन ते निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर ब्राह्मण सोसायटीचे सचिव म्हणूनही ते काही काळ कार्यरत होते. ब्राह्मण सोसायटी भागातील ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि विविध सामाजिक कामांशी त्यांचा जवळचा संबंध होता. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संघ परिवारातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.