Former office bearers of 'that' society, complain to police | ‘त्या’ सोसायटीतील माजी पदाधिकारी भीतीखाली, पोलिसांत तक्रारअर्ज
‘त्या’ सोसायटीतील माजी पदाधिकारी भीतीखाली, पोलिसांत तक्रारअर्ज

कल्याण : सोसायटीच्या कमिटीच्या वादाला कंटाळून राजेंद्र सोनवणे (४८) यांनी आत्महत्या केल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. याप्रकरणी सोसायटीतील तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याच सोसायटीतील अन्य काही रहिवाशांनाही त्रास देण्याचे प्रकार अजूनही सुरू आहेत. या त्रासाला कंटाळलेल्या सोसायटीतील माजी पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुले चौक पोलिसांकडे मंगळवारी तक्रारअर्ज दिला आहे.
प्रेम आॅटो परिसरातील विशाल राज सोसायटीतील माजी पदाधिकाऱ्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सोसायटीच्या कमिटीच्या त्रासाला कंटाळून सोनवणे यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोनवणे यांच्याप्रमाणेच आम्हालाही सोसायटीच्या कमिटीकडून त्रास दिला जात आहे. २०११ ते २०१७ या कालावधीत सोसायटीच्या पदाधिकाºयांनी देवराज चव्हाण याच्या सल्ल्याने आणि संमतीनेच कामे केली आहेत. त्यामुळे सोसायटीचा जो काही आरोप आहे, तो त्यांच्यावरसुद्धा लावायला हवा होता. पण, नवीन कमिटीने माजी पदाधिकाºयांवरच गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. ही बाब कमिटीच्या निदर्शनास आणून दिली असता आमच्या त्रासात अजूनच वाढ झाली. देवराजमुळे सोसायटीला खूप त्रास झाला असून सुनंदा सावंत या कोणत्याही पदावर नसताना सोसायटीच्या कारभारात हस्तक्षेप करतात. त्याचबरोबर, हारुण सय्यद हा सुद्धा रस्त्याने जातायेता शिवीगाळ करणे, सोसायटीचे पैसे परत कधी करणार, याबाबत सतत विचारणा करून त्रास देतात. आमच्यासह आमच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास झाल्यास देवराज, सुनंदा आणि हारुण यांना जबाबदार धरावे, अशी तक्रार दोघा माजी पदाधिकाºयांनी पोलिसांना दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी अद्याप तिघांना अटक केली नाही. त्यामुळे आम्ही दहशतीच्या वातावरणात राहत असल्याचे सोनवणे यांचे भाऊ सुनील यांनी सांगितले.

Web Title: Former office bearers of 'that' society, complain to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.