उल्हासनगरचे माजी आमदार शितलदास हरचंदाणी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 20:30 IST2020-07-07T20:30:13+5:302020-07-07T20:30:53+5:30
उल्हासनगर विधानसभा क्षैत्रातून सलग तीन वेळा भाजपच्या चिन्ह्यावर निवडून आले.

उल्हासनगरचे माजी आमदार शितलदास हरचंदाणी यांचे निधन
उल्हासनगर : उल्हासनगर विधानसभा क्षैत्रातून सलग तीन वेळा भाजपच्या तिकिटावर आमदारपदी निवडून आलेले शितळदास हरचंदाणी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी नवजीवन बँकेची स्थापना केली होती.
उल्हासनगर विधानसभा क्षैत्रातून सलग तीन वेळा भाजपच्या चिन्ह्यावर निवडून आले. त्यांनी शहरात उद्योग वाढीस लागण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी नवजीवन बँकेची स्थापना केली होती. राजकीय पटलावर पप्पू कलानी यांचा उदय झाल्यावर शितलानी यांनी नवजीवन बँक द्वारे शहरात आर्थिक जाळे निर्माण केले आहे. त्यांचे मुंबई बांद्रा येथील रुग्णालयात मंगळवारी अल्पशा आजार निधन झाले.