रिपाईचा माजी आमदार मात्र आता शिंदेसेनेत.... पप्पू कलानी

By सदानंद नाईक | Updated: March 1, 2026 19:02 IST2026-03-01T19:01:56+5:302026-03-01T19:02:27+5:30

अध्यक्ष पदावरून रिपाई आठवले गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

former mla of rpi party is now in shiv sena shinde group said pappu kalani | रिपाईचा माजी आमदार मात्र आता शिंदेसेनेत.... पप्पू कलानी

रिपाईचा माजी आमदार मात्र आता शिंदेसेनेत.... पप्पू कलानी

सदानंद नाईक,  उल्हासनगर : रिपाई आठवले गटाच्या पत्रकार परिषद वेळी उपस्थित असलेल्या माजी आमदार पप्पू कलानी यांनी रिपाई प्रवेशाला पूर्णविराम देत मी रिपाईचा माजी आमदार मात्र आता शिंदेसेने सोबत असल्याचे स्पष्ट केले. तसेच अध्यक्ष पदावरून रिपाई आठवले गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

 उल्हासनगर महापालिका निवडणुकी दरम्यान रिपाई मधील पंडित निकम गटाने जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांच्यावर आरोप करीत पक्षाचा शिंदेसेनेला नव्हेतर भाजपाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. निकम यांच्या पत्रकार परिषदेला आमदार कुमार आयलानी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, विधानसभा निवडणुक प्रमुख प्रदीप रामचंदानी उपस्थित होते. दरम्यान पक्षाचे वरिष्ठ नेते अण्णा रोकडे यांनी गेल्या महिन्यात पत्रकार परिषद घेऊन पंडित निकम यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष घोषित केले. तर नाना बागुल यांची पक्ष प्रमुख रामदास आठवले यांच्या आदेशानव्हे हकालपट्टी केल्याचे स्पष्ट केले होते.

 रविवारी रिपाईचे नेते व पक्ष निरीक्षक सुरेश बारासिंगे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाना बागुल हेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्याचे जाहीर केले. यावेळी पक्षाचे माजी आमदार पप्पू कलानी हेही उपस्थित होते. कलानी यांनी रिपाईत प्रवेश घेतला. अशी आवई उठल्यानंतर, पप्पू कलानी यांनी मला माजी आमदार या नात्याने पत्रकार परिषद मध्ये बोलाविले होते. माझी मुलगी सीमा कलानी यांनी शिंदेसेनेच्या चिन्हावर निवडणुक लढून नगरसेवक पदी निवडून आल्या आहेत. तर मुलगा ओमी कलानी यांच्या ओमी टीमने दोस्ती का महागठबंधन म्हणून शिंदेसेने सोबत युती करून समर्थकाना शिंदेसेनेच्या चिन्हावर नगरसेवक पदी निवडून आले. महापालिकेच्या महापौर अश्विनी निकम हयाही ओमी टीम गटातील आहेत. 

पप्पू कलानी यांच्या नावाची चर्चा 

रिपाईचे माजी आमदार म्हणून रिपाईच्या पत्रकार परिषदला उपस्थित होतो. प्रत्यक्षात मी शिंदेसेने सोबत आहे. असे स्पष्टीकरण पप्पू कलानी यांनी दिल्याने, कलानी यांच्या रिपाई प्रवेशाला ब्रेक मिळाला आहे. नाना बागुल हेच पक्षाचे जिल्हाऱ्यक्ष असल्याचे पक्षाने जाहीर केले. हाच पवित्रा यापूर्वी कलानी यांनी पत्रकार परिषद वेळी का जाहीर केले नाही. अश्या चर्चेला रंग चढला नाही.

Web Title : पूर्व आरपीआई विधायक पप्पू कलानी अब शिंदे सेना में, आरपीआई में नहीं

Web Summary : पप्पू कलानी ने स्पष्ट किया कि वे शिंदे सेना के साथ हैं, आरपीआई के साथ नहीं, भले ही उन्होंने आरपीआई प्रेस कॉन्फ्रेंस में भाग लिया। उल्हासनगर चुनावों के दौरान जिला अध्यक्ष पद को लेकर आरपीआई के भीतर गुटबाजी सामने आई, जिसमें परस्पर विरोधी घोषणाएं और गठबंधन हुए, जिससे शिंदे गुट के साथ कलानी की स्थिति और मजबूत हुई।

Web Title : Ex-RPI MLA Pappu Kalani Now with Shinde Sena, Not RPI

Web Summary : Pappu Kalani clarifies he is with Shinde Sena, not RPI, despite attending RPI press conference. Factionalism within RPI surfaces over district president post during Ulhasnagar elections, with conflicting announcements and alliances, further solidifying Kalani's position with the Shinde faction.