रिपाइंचे माजी जिल्हाध्यक्ष जे.के. ढोके यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2023 14:12 IST2023-08-04T14:12:17+5:302023-08-04T14:12:26+5:30
शांतीनगर येथील स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

रिपाइंचे माजी जिल्हाध्यक्ष जे.के. ढोके यांचे निधन
उल्हासनगर : रिपाइंचे माजी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक जे के ढोके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा आहे. शांतीनगर येथील स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी माजी आमदार पप्पु कलानी यांच्यासह रिपाई पदाधिकारी, कार्यकर्ते आदीजन उपस्थित होते.
भारतिय दलित पॅंथर पासुन आंबेडकरी चळवळीत सक्रिय असलेले जे.के. ढोके हे केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचे कट्टर समर्थक राहिले असून ते पक्षाचे अध्यक्ष असताना महापालिकेचे महापौर पद पक्षाकडे आले होते. सन-२००६ नगरसेवक पदी निवडुन आले होते. त्यांनी पक्ष सर्वसामान्य मध्ये पक्ष राबविण्याचे प्रयत्न केले. अंत्यसंस्कार यात्रेत माजी आमदार पप्पू कलानी, माजी नगरसेवक नाना पवार, बी.बी.मोरे, महादेव सोनवणे, भारीपचे नेते सारंग थोरात, माजी नगरसेवक राजु सोनवणे, प्रमोद टाले, प्रल्हाद गायकवाड, शांताराम निकम, अरुण कांबळे, भारीपचे शहरजिल्हाध्यक्ष शेषराव वाघमारे, समाजसेवक शिवाजी रगडे, मनोहर तायडे, एस.एस.ससाणे, गंगाधर मोहोड, प्रल्हाद गायकवाड, दिवाकर खळे, गौतम ढोके,यांच्यासह शेकडो पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी सामिल झाले होते.