प्रामाणिकपणा! विसरलेले २ लॅपटॉप रिक्षा चालकाने तरुणीला केले परत, कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 04:10 PM2021-07-31T16:10:52+5:302021-07-31T16:11:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - रिक्षातुन उतरताना विसरलेले २ लॅपटॉप प्रवासी तरुणीला रिक्षा चालकाने परत केल्याची घटना भाईंदर मध्ये ...

The forgotten 2 laptop rickshaw driver returned to the young woman | प्रामाणिकपणा! विसरलेले २ लॅपटॉप रिक्षा चालकाने तरुणीला केले परत, कौतुकाचा वर्षाव

प्रामाणिकपणा! विसरलेले २ लॅपटॉप रिक्षा चालकाने तरुणीला केले परत, कौतुकाचा वर्षाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - रिक्षातुन उतरताना विसरलेले २ लॅपटॉप प्रवासी तरुणीला रिक्षा चालकाने परत केल्याची घटना भाईंदर मध्ये घडली. भाईंदर पश्चिमेच्या भोलानगर मध्ये राहणारे  रिक्षा चालक छोटेलाल चौहान यांच्या रिक्षात शुक्रवारी सायंकाळी दीपाली शाह ही तरुणी प्रवास करत होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर ६० फुटी मार्गावरील मंगलमूर्ती इमारतीत राहणाऱ्या दिपालीचे २ लॅपटॉप ती रिक्षात विसरली. 

लॅपटॉप विसरल्याने चिंतित असलेल्या दिपाली ने घडला प्रकार अमित लालवानीला सांगितला. अमितने नगरसेवक पंकज पांडेयना याची माहिती दिली. पांडेय यांनी सदर माहिती त्यांच्या परिचयातील रिक्षाचालकांना रिक्षा क्रमांक व माहिती शेअर केली. 

शनिवारी सकाळी पप्पू नावाच्या रिक्षा चालकाने पांडेय यांना फोन करून , छोटेलाल ह्या रिक्षा चालकाच्या रिक्षात ते दोन लॅपटॉप सापडले असून छोटेलाल हा रात्री पासून प्रवासीचा शोध घेत असल्याचे सांगितले. त्या नंतर दिपाली हिला भेटून रिक्षाचालकाने दोन्ही लॅपटॉप तिला परत केले. तिने रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणा बद्दल कौतुक करत त्याचे आभार मानले.

Read in English

Web Title: The forgotten 2 laptop rickshaw driver returned to the young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app