ठाण्यातील पोलीस निरीक्षकाच्या मोबाईलची जबरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 20:38 IST2021-03-03T20:36:30+5:302021-03-03T20:38:29+5:30
ठाणे नगर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरटयाने पलायन केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे नगर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरटयाने पलायन केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
आपली पत्नी आणि मुलीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पांढरे हे कुटूंबियांना मोबाईलवरुन धीर देत टेंभी नाका येथील पोलीस विश्रामगृहासमोरील पदपथावरुन २७ फेब्रुवारी रोजी रात्री पायी जात होते. त्याचवेळी समोरुन आलेल्या या चोरटयांनी त्यांच्या हातातील मोबाईल अचानक हिसकावून पलायनाचा प्रयत्न केला. पांढरे यांनी त्याला तीव्र प्रतिकारही केला. यात ते पदपथावरुन खाली पडले. या झटापटीत ते किरकोळ जखमीही झाले. त्याचवेळी या चोरटयांनी तिथून पळ काढला. ठाणेनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.