ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण सोसायटींच्या रहिवाश्यांना घरपोच अन्नधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 09:56 AM2020-04-13T09:56:10+5:302020-04-13T09:56:32+5:30

भाजीपाला पुरवठ्यासाठी सहकार खाते सरसावले 

Food supply to residents of housing societies in Thane district | ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण सोसायटींच्या रहिवाश्यांना घरपोच अन्नधान्य

ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण सोसायटींच्या रहिवाश्यांना घरपोच अन्नधान्य

Next

सुरेश लोखंडे  
लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढ़ू नये यासाठी आपल्या  गृहनिर्माण संस्थामधील रहिवाश्यांना रास्त दरात घरपोच किराणा माल, तेल, मसाले, सुकामेवा, लोणचे, पापड, भाजीपाला, फळभाज्या, फळे, बेकरी पदार्थ, अंडी, दुग्धजन्य पदार्थ , अन्नधान्य मिळवून देण्यासाठी आता सहकार खाते पुढे आले आहे. जिल्ह्यातील या सोसायट्यांसाठी जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा मागणीनुसार सहकार विकास महामंडळाकडून होणार्‍या  पुरवठ्याचे नियोजन ठाणे जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील,  यांनी सांगितले. 
        ठाणे ज़िल्हयातील गृहनिर्माण संस्थांमधील
 सर्व रहिवाश्यांना  सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने सहकार  विकास महामंडळाद्वारे आता थेट घरपोच धान्य,भाजीपाला आणि फळे पुरविण्यासाठी महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. यानुसार गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाश्यांनी, सभासदानी आपली मागणी नोंदताच तत्काळ  जीवनावश्यक वस्तू, भाजीपाल, अन्नधान्य पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये धान्य आणि किराणा दोन दिवसात तर ताजा भाजीपाला दुसऱ्या दिवशी घरपोच मिळणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढ़ू नये यासाठी गृहनिर्माण संस्थामधील सभासदांना रास्त दरात घरपोच किराणा माल, तेल, मसाले, सुकामेवा, लोणचे, पापड, भाजीपाला, फळभाज्या, फळे, बेकरी पदार्थ, अंडी, दुग्धजन्य पदार्थ मिळावीत यासाठी सहकार विकास महामंडळाने हा निर्णय घेतलेला आहे.
         ठाणे ज़िल्हयातील गृहनिर्माण संस्थांचा प्रत्येक रहिवासी,  सभासदानी उत्स्फूर्तपणे लाभ घेण्यासाठी आपल्या मागणीसाठी वेळीच संपर्क करणे आवश्यक आहे. याशिवाय सहकार विकास महामंडळाचे www.mcdc.com या संकेत स्थळावर मागणीीनोंदवणे गरजेचे आहे,  असे आवाहन पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या संकेतस्थळावर धान्य, किराणामाल, पालेभाज्या आणि फळांची मागणी प्रत्येक रहिवाााशांना, सभासदाला नोंदविता येईल, यामध्ये समन्वय म्हणून सोसायटीचे चेअरमन किंवा सचिव काम पाहतील. प्रत्येक सोसायटीला विशिष्ट कोड क्रमांक देणार आहे. त्याचा वापर करुन सभासद मागणी नोंदवू शकतील. सहकार विभागाने सूरू क़ेलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा व योजनेचा ठाणे ज़िल्हयातील सर्व सभासद, रहिवासी मोठ्या संख्येने घेतील अशी अपेक्षा पाटील यांनी केले आहे.

Web Title: Food supply to residents of housing societies in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.