शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचनेमध्ये फिक्सिंग, आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; १५ ते १६ प्रभागांत हेराफेरी, किसन कथोरे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:04 IST

...प्रभाग रचनेचे प्रारूप मंजुरीकरिता नगरविकास विभागाकडे पाठवले असून, त्याला अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वी याची चौकशी करण्याची व बदलापूरची प्रभाग रचना नव्याने करण्याची मागणी कथोरे यांनी पत्रात केली.

बदलापूर : आगामी नगरपालिका निवडणुकीकरिता एका विशिष्ट पक्षाच्या स्थानिक नेते व अधिकारी यांनी हातमिळवणी करून आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना करवून घेतल्याचा थेट आरोप करणारे पत्र भाजप आ. किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. कथोरे यांनी पत्रात पक्षाचा नामोल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख शिंदेसेनेकडे असल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त होत आहेत. प्रभाग रचनेचे प्रारूप मंजुरीकरिता नगरविकास विभागाकडे पाठवले असून, त्याला अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वी याची चौकशी करण्याची व बदलापूरची प्रभाग रचना नव्याने करण्याची मागणी कथोरे यांनी पत्रात केली.

अंबरनाथ बदलापूर या दोन्ही नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा निश्चित करून तो नगर विकास विभागाकडे पाठवला आहे. मात्र, बदलापूर शहरातील प्रभाग रचना करताना पालिकेतील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आ. कथोरे यांनी केला. काही नगरसेवकांना फायदा होईल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या सोयीनुसार प्रभाग रचना करण्यात आली. १५ ते १६ प्रभागांमध्ये अशी हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. 

बदलापुरात सोयीनुसार यंत्रणेचा वापर  प्रभाग रचनेमध्ये अधिकाऱ्यांनी बदलापुरातील एका विशिष्ट पक्षाच्या सोयीसाठी सर्व यंत्रणा वापरल्याचा आरोप कथोरे यांनी केला. त्यामुळे प्रभाग रचनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची, तसेच चुकीची प्रभाग रचना रद्द करून नव्याने प्रभाग रचना करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी कथोरे यांनी फडणवीस यांच्याकडे केली.

टॅग्स :BJPभाजपाambernathअंबरनाथbadlapurबदलापूरElectionनिवडणूक 2024