गांजाचे सेवन करणाऱ्या पाच जणांना अटक
By Admin | Updated: October 14, 2016 06:34 IST2016-10-14T06:34:01+5:302016-10-14T06:34:01+5:30
गांजाचे सेवन करणाऱ्या पाच जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या दोन दिवसांत अटक केली आहे.

गांजाचे सेवन करणाऱ्या पाच जणांना अटक
ठाणे : गांजाचे सेवन करणाऱ्या पाच जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या दोन दिवसांत अटक केली आहे. पाचपैकी चौघांना ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वालझाडे आणि मनोहर घाडगे यांनी एका विशेष मोहिमेंतर्गत १३ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वा.च्या सुमारास संजय जयस्वाल (२५) आणि अब्दुल हादीखान (२५) रा. दोघेही जयभीमनगर, कळवा, ठाणे या दोघांना राबोडी परिसरात गांजा सेवन करताना अटक केली. त्यांच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर, ठाणे न्यायालयाच्या आवारात गांजा ओढणाऱ्या इसार महंमद वली महंमद अन्सारी (६२) या भिवंडीतील सुरक्षारक्षकालाही घाडगे यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास अटक केली. त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी, १२ आॅक्टोबर रोजी उपवन परिसरात गांजाचे सेवन करणाऱ्या राजेश म्हात्रे (३२) आणि संदेश कांबळे (२१, रा. दोघेही भिवंडी) या दोघांना उपवन भागातून उपनिरीक्षक धर्मराज बांगर यांच्या पथकाने अटक केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना ठाणे न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. (प्रतिनिधी)