ट्रकच्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:23 AM2019-06-03T00:23:27+5:302019-06-03T00:23:33+5:30

ट्रकचालकास अटक : अन्य एक चालक पसार

Five injured in two different truck accidents | ट्रकच्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जखमी

ट्रकच्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जखमी

Next

ठाणे : सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत दाम्पत्यासह दोन मुले किरकोळ जखमी झाल्याची घटना कापूरबावडी सिग्नलजवळ शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी सूर्यप्रकाश सरोज (२४, रा. ऐरोली, नवी मुंबई) या चालकाला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, अन्य एका घटनेत टँकरच्या धडकेमध्ये मकसूद शिकलगार (२६, रा. पेणकरपाडा, मीरा रोड, पूर्व) हा मोटारसायकलस्वारही जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे ५.३० वा.च्या सुमारास घडली.

सिमेंटचा मिक्सर असलेला हा ट्रक १ जून रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत कापूरबावडीनाका ते बाळकुमच्या दिशेने भरधाव जात होता. त्याचवेळी घोडबंदर रोडने ठाण्याच्या विवियाना मॉलकडे जाणाऱ्या एका कारला या ट्रकने जोरदार धडक दिली. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातामध्ये ही कार कंटेनरच्या समोरच्या चाकाला टेकली होती. यात चौघेही किरकोळ जखमी झाले. वाघबीळ येथे राहणाºया या कारचालकासह कारमधील त्याची पत्नी आणि १४ वर्षांची मुलगी तसेच १० वर्षांचा मुलगा या चौघांच्या जीवाला धोका होईल, असे कृत्य करणाºया सरोज या मिक्सरचालकाला अटक केली आहे.

ट्रक उलटला
एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेला दगडवाहू ट्रक उलटल्याची घटना रविवारी दुपारी मुंबई-नाशिक पूर्व द्रुतगती मार्गावरील ज्युपिटर रुग्णालयासमोर घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, अन्य एका अपघातामध्ये मोटारसायकलस्वार शिकलगार यांना उडवणाºया ट्रकचालकाविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. मकसूद हे त्यांच्या मोटारसायकलने घोडबंदरकडून ठाण्याकडे जाणाºया मार्गावरून जात होते. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला, हाताला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली. मोटारसायकलचेही यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर ट्रकचालकाने जखमीला कोणत्याही प्रकारची मदत न करता तिथून पलायन केले. याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ठाण्यात सातत्याने होणाºया अपघांबद्दल नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Web Title: Five injured in two different truck accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.