शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

उत्तन समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छतेसाठी मच्छिमार सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 17:51 IST

उत्तन मच्छिमारांनी उत्तन दर्यामाता चर्च, स्रेह ज्योत समाज केंद्र, कुटुंब सेवा केंद्र (एफएससी) यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या २६ सप्टेंबरपासून येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यास सुरुवात केल्याने येथील समुद्र किनारे यापुढे स्वच्छ राखले जातील.

- राजू काळे भार्इंदर, दि. २९ - उत्तन मच्छिमारांनी उत्तन दर्यामाता चर्च, स्रेह ज्योत समाज केंद्र, कुटुंब सेवा केंद्र (एफएससी) यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या २६ सप्टेंबरपासून येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यास सुरुवात केल्याने येथील समुद्र किनारे यापुढे स्वच्छ राखले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. सध्या उत्तनचे समुद्र किनारे अस्वच्छतेचे माहेरघर ठरु लागल्याने जलप्रदुषण वाढु लागले आहे. त्यातच या किनाऱ्यावर मोठ्याप्रमाणात मासेमारी होत असल्याने अस्वच्छतेत भर पडते. परिणामी किनाऱ्यावरील अस्वच्छतेमुळे तेथील लोकवस्तीतील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. तसेच स्वत:च्या घरापुरती स्वच्छता राखुन इतरत्र मात्र अस्वच्छता करावी, हे योग्य नसल्याची बाब मीरा-भार्इंदरच्या उत्तनकर मच्छिमारांच्या ध्यानी आली. त्यांनी यंदाच्या गांधी जयंतीचे औचित्य साधुन किनाऱ्यावरील अस्वच्छता स्वच्छ करण्याचा संकल्प सोडला. मात्र यात कोणताही लोकप्रतिनिधी वा स्थानिक प्रशासनाचे पाठबळ न घेण्याचाही निर्धार करण्यात आला. मात्र स्थानिक सामाजिक संस्था असलेल्या उत्तन दर्यामाता चर्च, स्रेह ज्योत समाज केंद्र, कुटुंब सेवा केंद्र यांच्याच संयुक्त विद्यमाने स्थानिक मच्छिमारांच्याच सहभागातुन स्वच्छता मोहिम २६ सप्टेंबरपासुन राबविण्याचा संकल्प करण्यात आला. २६ सप्टेंबरला मच्छिमारांनी स्वच्छता मोहिमेला नवीखाडी, भोतोडी बंदर, पातान बंदर येथील किनाऱ्यापासुन सुरुवात केली. स्वच्छतेतून जमा करण्यात आलेला कचरा मात्र पालिकेकडून वेळीच उचलण्यात न आल्याने तो किनाऱ्यावर तसाच पडुन राहिला. त्यामुळे तो समुद्रातील भरतीच्या पाण्यासाबेत पुन्हा समुद्रात जात असल्याची खंत स्थानिकांकडुन व्यक्त करण्यात आली. यामुळे किनाऱ्यावर पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने तो पुन्हा जमा करण्यात आल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. २९ सप्टेंबरला पुन्हा मोठागाव किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आल्यानंतर जमा करण्यात आलेला कचरा पालिकेकडुन विलंबाने उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले. पालिकेच्या या असहकारामुळे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेला प्रोत्साहन मिळत नसल्याची तक्रार स्वच्छता मोहिमेतील सहभागी मच्छिमारांकडुन करण्यात आली. तसेच पालिकेने स्थानिक मच्छिमारांच्या सहकार्याने दररोज किनाऱ्यावरील कचऱ्याची साफसफाई करावी, अशी मागणी मच्छिमारांकडून करण्यात आली. वेळोवेळी कचरा उचलला जावा, यासाठी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांना संपर्क साधला असता ते म्हणाले कि,संबंधित अधिकाऱ्याना नियुक्त कंत्राटदाराकडुन दररोज उत्तन किनाऱ्यावर जमा होणारा कचरा उलण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. किनारा स्वच्छ राखण्याची जबाबदारी स्थानिकांची सुद्धा असुन त्यांनी अस्वच्छता पसरविणाऱ्याना रोखून त्यांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करावे, असे अपेक्षित आहे. त्याला पालिकेकडून पूर्णत: सहकार्य केले जाईल.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर