‘मेकुनु’मुळे मच्छीमारांना दुहेरी फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:00 IST2018-06-01T01:00:36+5:302018-06-01T01:00:36+5:30

नव्या नियमामुळे शुक्रवार १ जूनपासून मासेमारीचा हंगाम बंद होतो आहे. मात्र मेकुनु वादळामुळे उत्तन, पाली, चौक भागातील मच्छीमार बोटी २५ मे पासूनच किनाऱ्यावर परतू लागल्याने

Fishermen double blow due to 'Makunu' | ‘मेकुनु’मुळे मच्छीमारांना दुहेरी फटका

‘मेकुनु’मुळे मच्छीमारांना दुहेरी फटका

मीरा रोड : नव्या नियमामुळे शुक्रवार १ जूनपासून मासेमारीचा हंगाम बंद होतो आहे. मात्र मेकुनु वादळामुळे उत्तन, पाली, चौक भागातील मच्छीमार बोटी २५ मे पासूनच किनाऱ्यावर परतू लागल्याने त्यांच्यावर हंगामाच्या शेवटी रिकाम्या हाताने घरी बसण्याची वेळ यंदा आली. सध्या बोटी किनाºयाला लावण्यासाठी मच्छीमारांची धावपळ सुरू आहे. वादळामुळे मासेमारीचे शेवटचे दिवस हातातून निसटल्याने आर्थिक फटका बसल्याने शेतकºयांंप्रमाणेच आम्हालाही नुकसानभरपाई द्या, अशी मागणी मच्छीमारांनी केली.
भार्इंदरच्या उत्तन, पाली, चौक किनारपट्टीवरील कोळीवाड्यांमध्ये मासेमारी करणाºया सुमारे ७०० बोटी आहेत. पावसाळ्यासाठी १ जूनपासून सरकार मासेमारीवर बंदी घालते. ही बंदी दोन महिने असेल आणि १ आॅगस्टपासून त्यावेळचे हवामान पाहून मासेमारी बोटी समुद्रात जातील.
१ जूनपासून मासेमारी बंदचा सरकारचा आदेश असला, तरी २३ ते २७ मे दरम्यानच्या मेकुनु वादळाच्या तडाख्यामुळे समुद्र खवळलेला होता. त्यामुळे हवामान खात्यासह मत्स्य विभागानेही मच्छीमारांना धोक्याचा इशारा दिला होता. परिणामी, हंगामातील शेवटची मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मासेमारी बोटींना नाईलाजाने मागे फिरावे लागले. ३१ मे ही मासेमारीची अंतिम मुदत असताना २५ मे पासूनच बोटी परतू लागल्या होत्या. चौक बंदर हे बोटी नांगरण्यासाठी सुरक्षित असल्याने बहुतांश बोटी याच बंदर परिसरात येतात. त्यामुळे सध्या येथे बोटी किनाºयाला खेचण्याचे काम मच्छीमारांनी सुरू केले आहे. ते एकत्र येऊन बोटी किनाºयाला ओढण्याचे काम करतातच; पण सोबत क्रेनचीसुद्धा मदत घेतली जाते.

Web Title: Fishermen double blow due to 'Makunu'