पहिल्या पावसाचे शहापुरात २ बळी

By Admin | Updated: June 2, 2017 05:25 IST2017-06-02T05:25:30+5:302017-06-02T05:25:30+5:30

बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसाचा फटका तालुक्यातील लग्न समारंभासाठी आलेल्या

First rain in Shahapur, 2 wickets | पहिल्या पावसाचे शहापुरात २ बळी

पहिल्या पावसाचे शहापुरात २ बळी

लोकमत न्यूज नेटवर्क
आसनगाव : बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसाचा फटका तालुक्यातील लग्न समारंभासाठी आलेल्या दाम्पत्याला बसला.
वडाच्या झाडावर पडलेल्या विजेत दोघांचा जागीच मृत्यू, तर एक गंभीररीत्या जखमी झाला. तालुक्यातील ठाकूरपाडा येथे लग्न समारंभासाठी गेलेल्या तानसा परिसरातील डिंबे येथील बुधाजी लडकू आगीवले (५५) व सारिका जयराम चौधरी (१२) या दोघांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर बुधाजी यांची पत्नी इंदिरा आगीवले यादेखील गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना शहापूर येथील उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी शहापूर पोलीस निरीक्षक संजय धुमाळ व खर्र्डी मंडळ अधिकारी कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
काही दिवसांपूर्वी मुरबाड तालुक्यातही अशाचप्रकारे झालेल्या मान्सूनपूर्व पावसात वीज पडून दोघा तरुणांचा मृत्यू झाला. तसेच दोन बैलही ठार झाले.

Web Title: First rain in Shahapur, 2 wickets