शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

खुशखबर... कल्याण ते वसई 'फेरी' ७० मिनिटांत, तीही अवघ्या २९ रुपयांत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 6:29 PM

उल्हास नदी, ठाण्याची खाडी आणि किनाऱ्यांचा वापर करून मुंबई महानगर प्रदेश पट्ट्यात जलवाहतूक व्यवहार्य ठरू शकते.

मुंबई: कल्याण आणि वसई दरम्यान लवकरच जलवाहतूक सुरू होणार आहे. डिसेंबर महिन्यापासून या फेरी सेवेचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे कल्याण ते वसई हे अंतर अवघ्या 70 मिनिटांत पार करता येणे शक्य होईल. सरकारच्या इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट (आयडब्ल्यूटी) योजनेंतर्गतही ही फेरी सेवा सुरू होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सोमवारी कल्याण-ठाणे ते वसई या मार्गावर डिसेंबरपासून ही फेरी सेवा सुरू होणार असल्याची घोषणा केली. हा मार्ग एकूण 47 किलोमीटरचा असेल. विशेष म्हणजे प्रवाशांना यासाठी प्रत्येकी 29 रूपये इतके माफक भाडे मोजावे लागेल. दर तीन वर्षांनी या भाड्यात 15 टक्क्यांनी वाढ होईल. ठाणे महानगरपालिकेकडून इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट यंत्रणेची तीन टप्प्यांत अंमलबजावणी केले जाणे अपेक्षित आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात वसई ते ठाणे-कल्याण या मार्गाचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात ठाणे ते मुंबई आणि तिसऱ्या टप्प्यात ठाणे ते नवी मुंबई या मार्गावर जलवाहतूक सुरू करण्याचा मानस आहे. उल्हास नदी, ठाण्याची खाडी आणि किनाऱ्यांचा वापर करून मुंबई महानगर प्रदेश पट्ट्यात जलवाहतूक व्यवहार्य ठरू शकते. ठाणे महानगरपालिकेने यापूर्वीच या संपूर्ण प्रकल्पाचा विस्तृत आराखडा केंद्र सरकारला सादर केला आहे. या प्रस्तावाला लवकरच केंद्रांकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील 47 किलोमीटरच्या मार्गासाठी 600 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गाला राष्ट्रीय जलवाहतूकमार्ग क्रमांक 53 असे नाव देण्यात येईल. त्यामुळे कल्याण ते वसई दरम्यानच्या प्रवासासाठी लागणारा दोन तासांचा अवधी 70 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. त्यासाठी वसई, मीरा-भाईंदर, ठाणे आणि कल्याणलगतच्या समुद्री परिसरात 10 बोटी तैनात करण्यात येतील. सुरुवातीच्या काळात नागला, कोलशेत आणि पारसिक या बंदरांवरून बोटी सुटतील. 

टॅग्स :water transportजलवाहतूकKalyan to Vasai ferry serviceकल्याण ते वसई फेरी सेवा