गोळीबार करुन रोकड लुटणाऱ्या आरोपीला रिव्हॉल्व्हरसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 21:44 IST2018-07-12T21:38:07+5:302018-07-12T21:44:34+5:30

गोळीबार करुन भिवंडीतील मोनिश जाधव या तरुणाकडील एक लाखांची रोकड लुटणा-या राजेश पटेल याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने रिव्हॉल्व्हरसह अटक केली आहे.

Firing: A robber robber was arrested along with the revolver | गोळीबार करुन रोकड लुटणाऱ्या आरोपीला रिव्हॉल्व्हरसह अटक

ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ठळक मुद्देठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईपिस्तुल आणि काडतुसेही हस्तगत गेल्या आठ महिन्यांपासून होता फरार

ठाणे : भिवंडीचे वारेट येथील रहिवासी मोनिश ऊर्फ बंटी जाधव यांची दुचाकी अडवून पिस्तुलाच्या धाकाने त्यांच्याकडील एक लाखाची बॅग जबरीने हिसकावून पळ काढणा-या राजेश बन्सराज पटेल याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे.
पटेल याने २३ आॅक्टोबर २०१७ रोजी मोनिश याची दुचाकी अडवून गोळीबार करून त्याच्याकडून ही रोकड लुटली होती. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. अंबाडी भागात अशाच प्रकारची ही दुसरी घटना असल्यामुळे भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार केली होती. या जबरी चोरीसाठी गोळीबार करणारा राजेश पटेल (३४, रा. वसई, जि. पालघर, मूळ रा. उत्तर प्रदेश) हा मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता. खबºयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला अखेर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Web Title: Firing: A robber robber was arrested along with the revolver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.