शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

माजी नगरसेवक संजेश पातकर यांच्यावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 11:56 PM

या घटनेने बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे.

बदलापूर : कुळगाव - बदलापूर नगरपरिषदेतील माजी नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक संजेश पातकर यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने संजेश या हल्ल्यातून बचावले. या घटनेने बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे.

बुधवारी (ता.३) संध्याकाळी संजेश पातकर त्यांच्या कर्जत रोडवरील मनोरमा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कार्यालयाच्या आवारात उभे होते. त्यावेळी पल्सर मोटरसायकलवरुन दोन अज्ञात इसम त्यांच्या कार्यालयासमोर आले. या दोघांनी डोक्यावर हेल्मेट घातले होते. तसेच त्यांनी चेहराऱ्यावर मास्क घातला होता. त्यांनी संजेश यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यावेळी संजेश बाजूला पळाल्याने थोडक्यात बचावले.

या घटनेचे वृत्त समजताच बदलापूर पूर्व व पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी, कर्मचारी तातडीने याठिकाणी पोहचले. सहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील,पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे आदींनीही घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली. पोलिसांनी याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे. दरम्यान, हा हल्ला कुणी व कशासाठी केला? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :badlapurबदलापूरFiringगोळीबार