ठाण्यात फटाक्याने लग्नाच्या मंडपाला आग

By जितेंद्र कालेकर | Updated: November 27, 2023 22:30 IST2023-11-27T22:29:59+5:302023-11-27T22:30:11+5:30

खोपट येथील तळ अधिक दोन मजली या ठिकाणी असलेल्या भानू अपार्टमेंट इमारतीच्या समोरील मैदानामध्ये लग्नाचे मंडप उभारले आहे.

Firecrackers set fire to marriage pavilion in Thane | ठाण्यात फटाक्याने लग्नाच्या मंडपाला आग

ठाण्यात फटाक्याने लग्नाच्या मंडपाला आग

लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: हळदीच्या मंडपात शॉक लागून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, सोमवारी रात्री ८.२० वाजण्याच्या सुमारास लग्नाच्या मंडपाला आग लागल्याची घटना खोपट परिसरात समोर आली. ही आग फटाक्याने लागली असून सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. पण, आग लागल्याने मंडप डेकोरेशनचे कापड तसेच प्लास्टिक ग्रीन नेट जळून नुकसान झाले आहे. अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

खोपट येथील तळ अधिक दोन मजली या ठिकाणी असलेल्या भानू अपार्टमेंट इमारतीच्या समोरील मैदानामध्ये लग्नाचे मंडप उभारले आहे. त्या मंडपाला सोमवारी रात्री आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेतली. ही आग स्थानिक रहिवासी व अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रणात आणल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

Web Title: Firecrackers set fire to marriage pavilion in Thane

टॅग्स :fireआग