दारूसाठी पैसे न दिल्याने फेकले आगीचे गोळे; उल्हासनगरमधील घटना

By सदानंद नाईक | Updated: December 19, 2022 17:38 IST2022-12-19T17:38:23+5:302022-12-19T17:38:56+5:30

उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

fireball throw for not paying for alcohol incident in ulhasnagar | दारूसाठी पैसे न दिल्याने फेकले आगीचे गोळे; उल्हासनगरमधील घटना

दारूसाठी पैसे न दिल्याने फेकले आगीचे गोळे; उल्हासनगरमधील घटना

सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-१ बेवस चौक परिसरात राहणाऱ्या प्रेम शर्मा यांनी ओळखीच्या मयूर उर्फ कालु व सोनू लिंबचिया यांना उसने व दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही. या रागातून गुरुवारी पहाटे साडे ५ वाजता बंद दुकानावर दगड व आगीचे गोळे फेकले प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर बेवस चौक परिसरात राहणारे प्रेम शर्मा यांचें यश हौसिंग इस्टेटड एजंट नावाचे परिसरात दुकान आहे. शर्मा यांच्या ओळखीचे मयूर कालु व सोनू लिंबचिया यांना दोन-5तीन वेळा दारू पिण्यासाठी पैसे दिले. १४ डिसेंबर रोजी मयूर यांनी गावी जाण्यासाठी उसने ५ हजार रुपये व दारू मागितली. मात्र यावेळी शर्मा यांनी दिली नाही. या रागातून त्यांनी १५ डिसेंबर रोजी पहाटे साडे ५ वाजता बंद दुकानावर दगड मारून तसेच आगीचे गोळे फेकून नुकसान केले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: fireball throw for not paying for alcohol incident in ulhasnagar