ज्वलनशील पदार्थाने रेल्वे केबिनला आग
By Admin | Updated: May 7, 2017 06:04 IST2017-05-07T06:04:03+5:302017-05-07T06:04:03+5:30
मध्य रेल्वेच्या जलदगती मार्गावरील कळवा, भोलानगर येथील रेल्वेच्या केबिनला ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावणाऱ्या अनोळखी

ज्वलनशील पदार्थाने रेल्वे केबिनला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मध्य रेल्वेच्या जलदगती मार्गावरील कळवा, भोलानगर येथील रेल्वेच्या केबिनला ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.
कळवा, भोलानगर येथील जलदगती मार्गावरील ३५/०५ येथे केबिन आहे. ती नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची घटना २८ एप्रिल रोजी घडली. या घटनेत, रेल्वेच्या नवीन रिले रूममधील ट्युब लाइट फुटली. तसेच वायरिंग जळाले आहे. तसेच या आगीमुळे खिडकीवर असलेल्या केबलचेही नुकसान केले.
याप्रकरणी शुक्रवारी कोपरीतील प्रमोद मधुकर पाटील यांनी कळवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुगले करीत आहेत.