शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरमध्ये ओंकार केमिकल कंपनीला आग, नऊ कामगार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 01:41 IST

बदलापूर माणकिवली गावाला लागून असलेल्या एमआयडीसीच्या केमिकल झोन परिसरातील ओंकार केमिकल कंपनीला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली.

बदलापूर : बदलापूर- माणकिवली गावाला लागून असलेल्या एमआयडीसीच्या केमिकल झोन परिसरातील ओंकार केमिकल कंपनीला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत कंपनीत काम करणारे नऊ कामगार भाजले आहेत. तर या आगीत संपूर्ण कंपनी नष्ट झाली. या कारखान्यात अत्यंत ज्वलनशील रसायन असल्याने ही आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होती. अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर ती आटोक्यात आली.बदलापूर एमआयडीसी भागातील ओंकार केमिकल कंपनीत दुपारी अचानक आग लागली. या आगीनंतर कंपनीमधील बॉयलरचाही स्फोट झाला. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढली. या कंपनीत प्रक्रियेसाठी आणलेले घातक रसायन मोठ्या प्रमाणात असल्याने ही आग आणखी भडकली. आगीची माहिती मिळताच बदलापूर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्या पाठोपाठ अंबरनाथ एमआयडीसी, कल्याण- डोंबविली महापालिका, अंबरनाथ नगरपालिका, उल्हासनगर महापालिकेची गाडी घटनास्थळी दाखल झाली.तीन तास प्रयत्न केल्यावर आगीवर नियंत्रण मिळवता आले. आग विझविण्याच्या कामात बदलापूरमधील अनेक टँकरची मदत घेण्यात आली. त्यामुळे ही आग विझविण्यासाठी कमी कालावधी लागला. मात्र या आगीत कंपनीत काम करणारे नऊ कामगार भाजले. दोन कामगार गंभीर तर सात कामगार किरकोळ भाजले आहेत. गंभीर भाजलेल्या रूग्णांना लागलीच नवी मुंबई आणि मुंबईच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर काहींना बदलापूरच्या स्थानिक रूग्णालयात दाखल केले आहे.दरम्यान, कंपनीला आग लागल्यावरही आग पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. प्रत्येकजण बघ्याच्या भूमिकेत या ठिकाणी उभे होते. तर काहीजण केवळ चित्रीकरण करण्यात व्यस्त होते. बघ्यांच्या गर्दीमुळे आग विझविण्यात अडचणी येत होत्या. अखेर पोलिसांनी बघ्यांना हुसकावून लावले.

टॅग्स :badlapurबदलापूरfireआगMIDCएमआयडीसी