उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळ लोकलच्या डब्याला आग, लोकल थांबावून गार्डने विझविली आग
By सदानंद नाईक | Updated: March 29, 2025 19:51 IST2025-03-29T19:51:20+5:302025-03-29T19:51:29+5:30
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळ लोकलच्या डब्याला आग, लोकल थांबावून गार्डने विझविली आग
सदानंद नाईक
उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्टेशनहून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलच्या एका डब्याला दुपारी १२ वाजता आग लागल्याने, प्रवासात भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोकलच्या गार्डने समयसूचकता दाखवून आग आटोक्यात आणल्याने, कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. असी माहिती स्टेशन मास्तर सविता नित्यानंद यांनी दिली.
उल्हासनगर रेल्वे स्टेशनहून अंबरनाथला जाणारी १२ वाजताची लोकल निघाली. अवघे १०० मिटरच्या अंतरावर जात नाही. तोच एका डब्यातून धूर निघाला. याप्रकाराने प्रवासानी आराडाओरड केली. लोकल चालकाने त्वरित लोकल थांबाविली. काही नागरिकांनी आग लागल्याच्या भीतीने लोकल खाली उड्या टाकल्या. लोकल गार्डन समयसूचकता दाखवून फायर बंबने आग विझविली.
तो पर्यंत उल्हासनगर स्टेशनहून इतर रेल्वे कर्मचारी मदतीला धावले होते. नदीच्या वळणावर ब्रेक मारल्याने, चाकात घर्षण होऊन धूर निघाला. असे स्टेशन मास्टर सविता नित्यानंद यांचे म्हणणे आहे. तर डब्यातील काही वस्तूने पेट घेतल्याने, धूर निघाला असे काही प्रवासाचे म्हणणे आहे. याप्रकाराने १५ ते २० मिनिटे लोकल खोळबल्या होत्या. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.