ठाणे: घोडबंदर रोडवरील ओवळा येथील 'द ब्ल्यू रूफ क्लब'मध्ये लग्न सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभादरम्यान मोठी आग लागण्याची घटना गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने, आग लागताच उपस्थितांनी प्रसंगावधान राखत बाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. फटाक्यांची ठिणगी जुन्या कार्पेटवर पडून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, आगीच्या संकटातून १२०० पाहुणे थोडक्यात बचावले.
ओवळा येथील पानखंडा गावातील बक्षी यांच्या मालकीच्या 'द ब्ल्यू रूफ क्लब' मध्ये एका लग्नसमारंभाचा स्वागत सोहळा सुरू होता. लॉनवरील स्टोअर केबिन आणि केबिनच्या बाहेर ठेवलेल्या मंडप डेकोरेशनच्या साहित्याला अचानक ही आग लागली. सोहळा सुरू असल्याने त्याठिकाणी सुमारे हजार ते बाराशे पाहुणे उपस्थित होते. आगीने अचानक रौद्र रूप धारण केल्याने उपस्थितांची भीतीने गाळण उडाली. जवळपास दीड तासाने अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले.
सर्वजण लॉनच्या बाहेर पडले
१. सुरक्षेच्या दृष्टीने सर्वजण तातडीने लॉनच्या बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच बाळकूम अग्निशमन केंद्र आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
२. दोन फायर वाहने, एक रेस्क्यू वाहन आणि एका युटिलिटी वाहनासह ही आटोक्यात आणण्याचे जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले, मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.
आग भटारखान्यामुळे की आणखी काही?
पार्किंगच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत मंडप डेकोरेशन स्टोअरजवळ जुने कार्पेट आणि इतर सामान ठेवलेले होते. त्याठिकाणी फटाक्यांमुळे ही आग लागल्याचे बोलले जाते. जवळच भटारखाना सुरू असल्याने नेमकी आग कशामुळे लागली, यामध्ये एकमत झाले नाही. यामध्ये मंडप डेकोरेशन, कार्पेट आदी सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Web Summary : A fire broke out at a Thane club during a wedding reception. Sparks from fireworks ignited old carpets, but thankfully, all 1200 guests escaped unharmed. Firefighters controlled the blaze within 90 minutes, preventing a major disaster. The exact cause remains under investigation.
Web Summary : ठाणे के एक क्लब में शादी के रिसेप्शन के दौरान आग लग गई। आतिशबाजी की चिंगारी से पुराने कालीन में आग लगी, लेकिन शुक्र है कि 1200 मेहमान सुरक्षित बच गए। दमकल कर्मियों ने 90 मिनट के भीतर आग पर काबू पा लिया, जिससे एक बड़ा हादसा टल गया। आग लगने का सही कारण अभी भी जांच के अधीन है।