VIDEO: ठाण्यात वागळे इस्टेट येथील कंपनीत भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी; स्फोटांचे हादरे कॅमेरात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 00:27 IST2022-05-28T23:08:09+5:302022-05-29T00:27:34+5:30
वागळे इस्टेट येथील अंबिकानगर भागात शनिवारी रात्री एका कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.

VIDEO: ठाण्यात वागळे इस्टेट येथील कंपनीत भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी; स्फोटांचे हादरे कॅमेरात कैद
ठाणे -
वागळे इस्टेट येथील अंबिकानगर भागात शनिवारी रात्री एका कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाही. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले. दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. याठिकाणी आठ ते नऊ स्फोट झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. दरम्यात यात अद्याप कोणतीही जीवीतहानी हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
VIDEO: ठाण्यात वागळे इस्टेट येथील कंपनीत भीषण आग, अग्नशमन दल घटनास्थळी pic.twitter.com/B5lE6Igq45
— Lokmat (@lokmat) May 28, 2022
अंबिकानगर येथील रोड नंबर २९ परिसरात एक कंपनी आहे. शनिवारी रात्री एका कंपनीला भीषण आग लागली. अवघ्या अर्ध्या तासामध्ये याठिकाणी आठ ते नऊ स्फोट झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून आग विजविण्याचे प्रयत्न सुरू केले गेले. त्यानंतर काही तासांत आग नियंत्रणात आली. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू असून आगीत कुणी अडकलं किंवा जखमी झालंय का याची खातरजमा केली जात आहे.
VIDEO: ठाण्यात वागळे इस्टेट येथील कंपनीत भीषण आग, स्फोटांचे हादरे कॅमेरात कैद pic.twitter.com/19RkQMaWwp
— Lokmat (@lokmat) May 28, 2022
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देखील घटनास्थळी पोहोचले-