उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य, आग विझविण्याचे प्रयत्न
By सदानंद नाईक | Updated: February 12, 2024 19:39 IST2024-02-12T19:36:40+5:302024-02-12T19:39:01+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील डम्पिंग ग्राऊंडला सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याने, सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले आहे.

उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य, आग विझविण्याचे प्रयत्न
उल्हासनगर : महापालिका डम्पिंग ग्राऊंडला सायंकाळी आग लागून परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे प्रयत्न करीत असून आग घुमसत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील डम्पिंग ग्राऊंडला सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याने, सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले आहे. या धुराने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले असून आग संपूर्ण डम्पिंगवर पसरली आहे. आगीच्या धुराने हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. डम्पिंग ग्राऊंडचा काही अंतरावरच राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांची एल्गार सभा सुरू होती. अग्निशमन दलाचे चार पेक्षा जास्त बंब आग विझवीत आहेत. महापालिका अधिकाऱ्यांनी डम्पिंगला भेट देऊन आग विझविण्याचे पराकाष्ठा करीत असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली.