शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कामकाजामध्ये आर्थिक शिस्तीचे पालन करणे आवश्यक - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 18:58 IST

ठाणे : शासकीय कामकाजामध्ये वित्त विषयक सर्व बाबी गांभीर्याने हाताळण्याबरोबरच त्यांचा जलद गतीने निपटारा करण्यावर भर देण्यात यावा, तसेच ...

ठळक मुद्दे‘कोकण विभागातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची एक दिवशीय कार्यशाळाठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील २५० आहरण व संवितरण अधिकारी उपस्थित काम केले तर सर्व देयकांचा वेळेत व जलद गतीने निपटारा करणे सहज शक्य

ठाणे : शासकीय कामकाजामध्ये वित्त विषयक सर्व बाबी गांभीर्याने हाताळण्याबरोबरच त्यांचा जलद गतीने निपटारा करण्यावर भर देण्यात यावा, तसेच या बाबी हाताळताना आर्थिक शिस्तीचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले.       येथील नियोजन भवनमध्ये ‘प्रलंबित संक्षिप्त देयके व उपयोगिता प्रमाणपत्र’ या विषयी लेखा विभागाचे सह संचालक व कोकण विभाग कोषागारे यांच्याव्दारे ‘कोकण विभागातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची एक दिवशीय कार्यशाळा गुरूवारी पार पडली. दोन सत्रात पार पडलेल्या या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. शासकीय कामकाज करतांना वित्त विषया बाबत सर्वजण अतिशय जागरूक असतात. तरी कालमर्यादा किवा अन्य काही बाबींमुळे संक्षिप्त देयके व उपयोगिता प्रमाणपत्रांचा वेळेत निपटारा होत नाही. सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी प्रलंबित संक्षिप्त देयकांचा व उपयोगीता प्रमाणपत्रांचा वेळेत निपटारा करणे आवश्यक असल्याचे नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी वरिष्ठ उप महालेखापाल एस. एस सरफरे, सहसंचालक लेखा व कोषागारे सिताराम काळे, जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर, सहायक लेखाधिकारी ललिता नारायणस्वामी, सहायक संचालक संजय गोरे आदी उपस्थित होते.         प्रलंबित संक्षिप्त देयक, उपयोगिता प्रमाणपत्र या अनुषंगाने प्रत्येक आहरण व संवितरण अधिकाऱ्यांने घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन वरिष्ठ उप महालेखापाल सरफरे यांनी केले. एखाद्या ठिकाणी बदली झाल्यानंतर उद्या परत बदली होणार आहे, हा दृष्टीकोन ठेवून काम केले तर सर्व देयकांचा वेळेत व जलद गतीने निपटारा करणे सहज शक्य आहे. अनेकदा वेळेवर सादर न केलेली देयके प्रलंबित राहतात आणि नंतर ती संख्या वाढत जाते. तसेच उशीर झाल्याने देयकांचा चा वेळेत निपटारा होत नाही. त्याचे लेखा विषयक प्रतिकूल परिणाम होतात. विहित मुदतीत तपशीलवार देयके सादर करण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाने ठेवला तर कुठल्याही प्रकारची देयके प्रलंबित राहणार नाहीत असे ही त्यांनी सांगितले. यावेळी सहसंचालक काळे यांनी उपस्थिताना सखोल मार्गदर्शन केले.         या कार्यशाळेच्या दुसऱ्यां सत्रात सहायक लेखाधिकारी नारायणस्वामी यांनी पावर पोइंट प्रेझेन्टेशनसह सविस्तर मार्गदर्शन केले. देयके सादर करतांना घ्यावयाची काळजी आदीं विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील २५० आहरण व संवितरण अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून संबधित सर्व घटकांचा महालेखापाल कार्यालयाशी थेट संवाद करण्यासह जागरु कता निर्माण होवून प्रलंबित संक्षिप्त देयके व उपयोगिता प्रमाणपत्रांचा निपटारा जलद गतीने होण्यास चालना मिळणार असल्याची अपेक्षा यावेळी उपस्थित व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :thaneठाणेEconomyअर्थव्यवस्था