शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

...अखेर पोलिसांना हक्काची घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:02 AM

१७ वर्षे दिला लढा; पोलीस महिला मंडळाच्या पाठपुराव्याला यश

ठाणे : वर्तकनगर येथील म्हाडाच्या धोकादायक इमारतींमधील ३४० पोलीस कुटुंबियांना पुनर्बांधणीत हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेली १७ वर्षे यासाठी लढा देणाऱ्या येथील जनसेवा महिला मंडळाने आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वखाली गेली चार वर्षे पोलीस आयुक्त ते मुख्यमंत्री असा यशस्वी पाठपुरावा केला होता.वर्तकनगर येथील म्हाडाच्या ५८ ते ६१,५१ ते ५३ तसेच १४ आणि १६ अशा दहा इमारतींमध्ये पोलिसांची ३४० कुटूंबे याठिकाणी वास्तव्याला आहेत. या इमारती ४० वर्षे जुन्या असून त्या धोकादायक असल्याचे ठाणे महापालिकेने जाहीर केले आहे. गेली काही वर्षे ही कुटुंबे जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर या कुटूंबांना ही घरे पोलीस प्रशासनाकडे परत द्यावी लागतात. त्यामुळे प्रामाणिकपणे सेवा बजावणारे पोलीस आणि त्यासाठी त्याग करणारे कुटुंब बेघर होतात. या कुटुंबांना तात्पुरती घरे न मिळता हक्काची घरे मिळावीत, यासाठी येथील जनसेवा महिला मंडळ गेली १७ वर्षे शासनाकडे मागणी करीत होते.या महिला पदाधिकाºयांनी केळकर यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन पोलीस आयुक्त विजय कांबळे तसेच सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांची भेट घेऊन मालकी हक्काच्या घरांबाबतच्या विषयाचे गाºहाणे मांडल्यामुळे या मागणीला चालना मिळाली. तत्कालीन गृहसचिव के.पी.बक्षी यांच्याशीही मंडळाने भेट घेऊन चर्चा केल्यानंतर त्यांनीही या मागणीला हिरवा कंदील दिला होता. पुनर्बांधणीत सेवानिवृत्त आणि मृत पावलेल्या कर्मचाºयांच्या कुटूंबियांना प्राधान्याने घरे देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानंतर केळकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचे मंडळाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. त्यावेळी या कुटुंबांना मालकी हक्काची घरे देण्याची खात्री त्यांनी दिली. त्याप्रमाणे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पोलीस गृहनिर्माण मंडळास ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याप्रमाणे पोलीस महासंचालकांच्या दालनात २०१७-२०१८ मध्ये तीन बैठका झाल्या. त्यानुसार २.५ एफएसआय देण्याचे ठरले.दरम्यान, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांची नुकतीच भेट घेवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली असून पोलीस खात्याने मान्यता दिली तर म्हाडा पुनर्विकास करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या स्तरावर संबंधित खात्याची बैठक घेण्याबाबत विनंतीपत्र दिलेले असून लवकरच बैठक घेण्याचे त्यांनी मान्य केल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.आ. केळकरांचेही सहकार्यपोलिसांच्या मागणीला ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळेही यश आले आहे. केळकर यांनी नियमितपणे पाठपुरावा करु न पोलिसांना हक्काची घरे मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकारी महिलांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणे