सुरक्षाचौकीला अखेर बसवला दरवाजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 03:47 IST2018-09-01T03:46:53+5:302018-09-01T03:47:24+5:30
महापालिका प्रशासन खडबडून जागे : सुरक्षारक्षकांनी मानले आभार

सुरक्षाचौकीला अखेर बसवला दरवाजा
डोंबिवली : शहरातील सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलातील सुरक्षाचौकीचा दरवाजा तुटला होता. याबाबतचे वास्तव ‘लोकमत’ने मांडताच केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले. अखेर, गुरुवारी चौकीला नवीन दरवाजा बसवण्यात आला. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.
क्रीडासंकुलात प्रत्येक शिफ्टसाठी तीन कर्मचारी तैनात केले जातात. त्यापैकी दोन कर्मचारी तरणतलावाच्या सुरक्षेसाठी, तर क्रीडासंकुलाच्या सुरक्षेसाठी केवळ एक कर्मचारी असतो. ही सुरक्षा तुटपुंजी असताना त्यात सुरक्षाचौकीचा दरवाजा तुटल्याने कर्मचाऱ्यांची आधीच संकुलाच्या दोन प्रवेशद्वारांपैकी एक बंद केला आहे. तसेच गेल्या पाच महिन्यांपासून सुरक्षाचौकीचा दरवाजा तुटला होता. यासंदर्भात सुरक्षा विभागाने बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहारही केला होता. परंतु, त्याकडे संबंधित विभागाकडून कानाडोळा केला जात होता.