शासन आपल्या दारी कार्यक्रम स्थळी अंतिम तयारी आढावा
By सुरेश लोखंडे | Updated: March 2, 2024 19:24 IST2024-03-02T19:24:03+5:302024-03-02T19:24:54+5:30
एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम प्रीमियर मैदान, कल्याण-शिळफाटा रोड, कोळे, कल्याण, येथे रविवारी पार पडत आहे.

शासन आपल्या दारी कार्यक्रम स्थळी अंतिम तयारी आढावा
ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम प्रीमियर मैदान, कल्याण-शिळफाटा रोड, कोळे, कल्याण, येथे रविवारी पार पडत आहे. त्यांच्या संपूर्ण तयारीचा आढावा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या कार्यक्रमाचा अंतिम तयारी आढावा बैठक प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी पार पडली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये-धुळे, उपायुक्त सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, विकास गजरे, विकास गुजर, विजयानंद शर्मा, अमित सानप, दीपक चव्हाण, तहसिलदार सचिन शेजाळ, प्रशांती माने, अभिजीत खोले, "शासन आपल्या दारी" या कार्यक्रमासाठीचे मुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वयक विकास आवटी आदींसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे हे देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.