आचारसंहिता उल्लंघनाचा दोघांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: February 21, 2017 05:46 IST2017-02-21T05:46:10+5:302017-02-21T05:46:10+5:30

ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने अनधिकृतपणे प्रचार करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हेमंत

Filed under both the Code of Conduct violation | आचारसंहिता उल्लंघनाचा दोघांवर गुन्हा दाखल

आचारसंहिता उल्लंघनाचा दोघांवर गुन्हा दाखल

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने अनधिकृतपणे प्रचार करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हेमंत जाधव आणि गणेश टाक (रा. पाटोणपाडा, ठाणे) या दोघांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाचे उपकार्यालयीन अधीक्षक प्रभाकर शिंदे हे पथकासह फिरत असताना त्यांना हे दोघेही अनधिकृतपणे
प्रचार करताना आढळले. निवडणुकीच्या कालावधीतील अटी आणि नियमांचा भंग करत आचारसंहितेचा भंग केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक डी.ई. गोडे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Filed under both the Code of Conduct violation