शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कल्याणमध्ये क्षुल्लक कारणावरून वडील-मुलाची तरूणाला मारहाण, तरूणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 15:13 IST

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून बापासह अल्पवयीन मुलाने केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याण पुर्वेकडील सूचक नाका परिसरात घडली आहे .

कल्याण- क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून बापासह अल्पवयीन मुलाने केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याण पुर्वेकडील सूचक नाका परिसरात घडली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी  कलिम शेखला अटक करत त्याच्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. वडील व मुलाच्या मारहाणीत आफताब आलम या तरूणाचा मृत्यू झाला आहे. 

कल्याण पुर्वेकडील सूचक नाका परिसरात राहणारा आफताब आलम याचं त्याच परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलांबरोबर भांडण झालं होतं. ही बाब या मुलाचे वडील कलिम शेख यांना समजताच त्यांनी आफताबला जाब विचारण्यासाठी काल रात्री आफताबला गाठलं. यावेळी दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादामुळे संतापलेल्या कलिम शेख आणि त्यांचा १६ वर्षाचा मुलगा याने आफताबला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आफताबच्या गुप्तांगाला फटका लागल्याने आफताबचा मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून कलिम शेखला अटक करत त्याच्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे .या घटनेमुळे कल्याण पूर्वेत एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाDeathमृत्यू