उडवलेल्या कोंबड्या पकडण्यासाठी शिवसैनिक-पोलीस यांच्यात झटापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:44 IST2021-08-25T04:44:54+5:302021-08-25T04:44:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या डोंबिवली शहर शाखेने कल्याण उपजिल्हाप्रमुख ...

Fight between Shiv Sainiks and police to catch blown chickens | उडवलेल्या कोंबड्या पकडण्यासाठी शिवसैनिक-पोलीस यांच्यात झटापट

उडवलेल्या कोंबड्या पकडण्यासाठी शिवसैनिक-पोलीस यांच्यात झटापट

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या डोंबिवली शहर शाखेने कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, युवा सेना पदाधिकारी सागर जेधे, राहुल म्हात्रे आदी शिवसैनिकांनी इंदिरा गांधी चौकात कोंबड्या उडवल्या. त्या कोंबड्या पकडण्यासाठी शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली.

जेधे यांनी राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यानंतर राणे यांची छबी असलेला आणखी एक पुतळा शिवसैनिकांनी आणून फाडला व जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, असे या वेळी थरवळ म्हणाले. वैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीवर असे व्यक्तव्य करू नये. याबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केल्याचे आश्वासन दिले.

राणे यांनी डोंबिवलीत पाऊल ठेवू नये, ठेवल्यास त्यांच्या स्वागताची तयारी केली जाईल, असे खुले आव्हान शिवसेना महिला शहर आघाडीच्या कविता गावंड, वैशाली दरेकर, मंगला सुळे आदींनी केले.

-------------

Web Title: Fight between Shiv Sainiks and police to catch blown chickens