फिव्हर सर्व्हे आजपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:54 IST2021-02-20T05:54:17+5:302021-02-20T05:54:17+5:30
-गावावरून येणाऱ्यांची होणार ॲंटिजेन टेस्ट राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा कोरोना वाढत असल्याने या भागातून ठाण्यात येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्टेशन, ...

फिव्हर सर्व्हे आजपासून सुरू
-गावावरून येणाऱ्यांची होणार ॲंटिजेन टेस्ट
राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा कोरोना वाढत असल्याने या भागातून ठाण्यात येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्टेशन, बसस्थानक, एसटीस्थानक या ठिकाणी बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी आणि चाचणी करणे बंधनकारक केले असून या ठिकाणी चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
-मेडिकलचा साठा पुरेसा
कोरोनाची दुसरी लाट येईल का नाही, याबाबत आताच ठामपणे सांगता येणार नाही. परंतु, आली तर महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यासाठी लागणारी अत्यावश्यक औषधे म्हणजेच रेमडिसीव्हर, टॉपलिझीम, पीपीई किट, सॅनिटायझर, ऑक्सिजनचा देखील तुटवडा असणार नाही, २०० हून अधिक व्हॅन्टिलेटर सज्ज आहेत. आदींसह इतर औषधांचा पुरेसा साठा केला असून नव्याने निविदादेखील काढण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.