गटारे, नाल्यांमधील घाणीमुळे रोगराई पसरण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:40 IST2021-05-26T04:40:12+5:302021-05-26T04:40:12+5:30
मुंब्राः ठामपा क्षेत्रात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे सुरू असून नालेसफाई केल्यावर नाले, गटारातील घाण आणि कचरा काढून रस्त्याच्या बाजूला ...

गटारे, नाल्यांमधील घाणीमुळे रोगराई पसरण्याची भीती
मुंब्राः ठामपा क्षेत्रात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे सुरू असून नालेसफाई केल्यावर नाले, गटारातील घाण आणि कचरा काढून रस्त्याच्या बाजूला अनेक दिवस तसाच ठेवण्याच्या पद्धतीमुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
नाल्यातील कचरा सुकवण्याकरिता काढून ठेवतात. काही दिवसांनी तो भरून नेतात. कर्मचाऱ्यांच्या या निष्काळजीपणामुळे त्या घाणीमुळे शहरात रोगराई पसरण्याची भीती परिवहन समितीचे सदस्य शमीम खान यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या काळात शहरामध्ये आणखी रोगराई पसरू नये यासाठी नाले, गटारांमधील कचरा काढाताक्षणी त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावी. तसेच ज्या ठिकाणी तो जमा करून ठेवला असेल त्या ठिकाणी कीटकनाशक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी खान यांनी महापौर, विरोधी पक्षनेते, आयुक्त, आरोग्य अधिकारी आदींकडे निवेदनाद्वारे केली.
.......
वाचली